शिंदे-फडणवीस सरकारचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खाते वाटप झाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यामागची त्यांची भावना अशी आहे की, “१८ व्या शतकामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम् हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम् हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द”
( हेही वाचा : ‘वंदे मातरम’ची काँग्रेसलाही ऍलर्जी! धर्मांध रझा अकादमीच्या पावलावर पाऊल )
आता त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ झालेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की वंदे मातरम्साठी बळजबरी का? मराठी माणूस फक्त नमस्कार म्हणणार. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कॉंग्रेसच्या नेत्यांना घेऊन तयार करण्यात आला आहे. ते नेहमी संविधान, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा शब्दांचा वापर करत असतात.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी कधी वंदे मातरम् या गीतावर किंवा शब्दांवर टीका केल्याचे ऐकिवात नाही. वंदे मातरम् हे घोषवाक्य म्हणजे क्रांतिकारकांचा मंत्रच होता. देशातल्या सर्व क्रांतिकारकांनी वंदे मातरम्च्या घोषणा देत इंग्रजांशी दोन हात केलेले आहेत. अहिंसावादी आणि सशस्त्र क्रांतिकर अशा सर्व क्रांतिकारकांना वंदे मातरम् प्रिय होतं. या शब्दांत मातॄभूमीविषयीची उदात्त भावना आहे, प्रचंड प्रेम आहे.
मग या शब्दांची जितेंद्र आव्हाड यांना इतकी एलर्जी का आहे? जितेंद्र आव्हाड यांची अनेक विधाने वादग्रस्त आहेत. अनंत करमुसेला मारहाण केल्याचं प्रकरण देखील ताजं आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही असे शब्द उच्चारते तेव्हा शब्दांना देखील लाज वाटत असावी. अर्थात न्यायदेवतेकडे असलेल्या प्रकरणांबद्दल आपण न बोललेले बरे.
परंतु एकंदर जितेंद्र आव्हाड यांचं व्यक्तिमत्व पाहता त्यांना वंदे मातरम् या महान गीताविषयी देखील आक्षेप असल्यास कुणालाच आश्चर्य वाटणार नाही. १५ ऑगस्टला देशभरात पं. ओंकारनाथ ठाकूर यांनी आकाशवाणीवर प्रस्तुत केलेल्या ऐतिहासिक वंदेमातरम् गायनाचे पुनःस्मरण करण्यात आले. संस्कार भारती कोंकण प्रांतने हा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केला होता. यामुळे जितेंद्र आव्हाड यांना दुःख झालं असावं. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत आणि त्यांना वंदे मातरम्वर आक्षेप आहे, लोकशाहीसाठी यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट ती कोणती!
Join Our WhatsApp Community