दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत आता दुकानदारांनीही आता महापालिकेला कोंडीत पकडले आहे. दुकानांबाहेरील मॅनिक्वीनवर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पदपथ आणि रस्ते अडवून बसणारे अनधिकृत फेरीवाले दिसत नाही का? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज, प्रार्थनास्थळे ही फेरीवालामुक्त क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. मग अशा क्षेत्रात महापालिका कायमची कारवाई का करत नाही असा प्रश्नही दादरमधील व्यापाऱ्यांनी उपस्थित करत दादरमधील फेरीवाल्यांवर महापालिकेच्या माध्यमातून सुरु केलल्या कारवाईच्या नौटंकीवर प्रकाशझोत टाकला आहे.
दादरमधील दुकानदारांना महापालिकेच्या जी उत्तर विभागाने नोटीस पाठवून दुकान बंद केल्यानंतर तेथील कचरा स्वच्छ राखला जावा अशाप्रकारच्या सूचना केल्या आहे. याबाबत दादर व्यापारी संघाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत हा कचरा फेरीवाल्यांकडून केला जात असताना करदात्या आणि स्वच्छता राखणाऱ्या दुकानदारांना अशाप्रकारचे आदेश का बजावले जातात असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शाह आणि सचिव विद्यासागर नाईक व दीपक देवरुखकर यांनी या निवेदनात, आपल्या माननीय पंतप्रधानांची घोषणा आहे बी “बी लोकल बी वोकल” पण हे अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय व बांगलादेशी अशा फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी असलेले फूटपाथ हे अशा परप्रांतीय व अनधिकृत फेरीवाल्यांंमार्फत काबीज केल्याचे दिसतेय. तरीही त्यांच्या महापालिका प्रशासन ताकदीने कार्यवाही करताना दिसत नाही, असे म्हटले आहे.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’)
दादरमधील सर्व व्यापारी आपापल्या आस्थापनाचा कचरा जवळील कचराकुंडीतच टाकत आहेत आणि अनेक वर्षापासून हिच पद्धत अवलंबत आहेत, कारण कुठल्याही दुकानदाराला आपल्या दुकाना समोरील परिसर स्वच्छच ठेवायला आवडते व तसेच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करित असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन, शाळा कॉलेज, प्रार्थना स्थळे ही फेरीवालामुक्त क्षेत्र घोषित केली असतानाही महापालिका अशा क्षेत्रात का कायमची कार्यवाही करित नाही हाच मोठा प्रश्न व्यापारी संघाने उपस्थित होता.
दादर विभागात गेल्या एक महिन्यांपासून काय नाटक चाललेय ते सर्व नागरीक पहात आहेत. काही वेळा करता या फेरीवाल्यांवर कशा प्रकारे नाटकीय पद्धतीने कार्यवाही केली जात आहे ते. थोड्या वेळा करता नाटक होते व पुन्हा पूर्ववत परिस्थती होताना सर्व नागरिक पहात आहेत. या नाट्यमय प्रकारात अनेकदा दुकानदारांनाही नाहक त्रास दिला जात आहे.
दुकानदार त्यांच्या दुकानांबाहेर व दुकानांच्या हद्दीत माल ठेवतात. जेणेकरून नागरिकांना चालताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन पुतळा त्यांचे कपडे (मॅनीक्वीन) घालून ठेवतात आणि अशांवर महापालिकेचे अधिकारी कार्यवाही करतात व तोच पुतळा न काळजी घेता कसाही त्यांच्या गोडाऊन मध्ये ठेवतात. अशा पुतळ्यावरील ड्रेस खराब होतो व तो विकण्यासाठी पुन्हा ठेवता येत नाही व दुकानदारांचे नुकसान होते. पण फेरीवाल्यांवर मात्र नाटकीय कार्यवाही केली जाताना दिसते, अशी दुटप्पी कार्यवाही करणे चुकीचे असल्याचे व्यापारी संघाने निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community