भारतात भूकंपाचे हादरे का बसतात; महाराष्ट्रात कोणता भूभाग आहे भूकंपप्रवण?

222

मंगळवार, २४ जानेवारी २०२३ रोजी नेपाळ येथे १० किलोमीटर खोलीवर ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले. उत्तर भारतातील पंजाब आणि दिल्ली भागांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवल्याचे समजते. गेल्या काही दशकांमध्ये ह्या भागातही अनेक भूकंप झाल्याच्या नोंदी आहेत. ईशान्य भारताच्या विलक्षण भौगोलिक रचनेमुळे भूकंपाचा प्रभाव तेथेही सातत्याने दिसून येतो. 1897 आणि 1950 मध्ये आसाम राज्यानेच दोन मोठे भूकंप (८ पेक्षा जास्त तीव्रतेचे) अनुभवले. देशाच्या उत्तरेकडे एवढे भूकंप होण्याची कारणे आपण जाणून घेतले पाहिजे.

देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात होणाऱ्या भूकंपाचे एक मोठे कारण म्हणजे, भारत आणि नेपाळचे काही भाग दोन महान टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमांवर वसलेले आहेत. ह्या दोन्ही प्लेट्सच्या मिलनामुळे हिमालयाची निर्मिती झाली. यामुळे भारत आणि नेपाळ ह्या दोन्ही देशांना भूकंपाचा धोका निर्माण झाला. दिल्ली हे शहर सोहना, दिल्ली-मुरादाबाद आणि मथुरा ह्या तीन सक्रिय भूकंपीय फॉल्ट लाईनवर वसलेले आहे. दिल्ली हे भारतीय मानक ब्युरोने वर्गीकृत केलेल्या एकूण पाचपैकी चौथ्या-उच्च भूकंपीय क्षेत्रामध्ये वसलेले आहे.

(हेही वाचा Love Jihad : विवाहासाठी मुसलमान तरुणाकडून हिंदू तरुणीला ब्लॅकमेल)

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भूकंपाचा धोका कोयना प्रदेशाला 

भारताचा ईशान्य भाग कोपीली फॉल्ट झोन (पाचव्या भूकंपीय क्षेत्र) मध्ये स्थित आहे. या ठिकाणी गाळाची मृदा आढळते, या मृदेमध्ये भूकंपाच्या लाटांना अडकवून ठेवण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भूकंपाचा धोका कोयना प्रदेशाला आहे. कोयना येथील भूकंप जलाशयातील पाण्याचा भार आणि भूकंपाच्या वाढीमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ह्या व्यतिरिक्त खाणकाम, मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम उत्खनन, कृत्रिम तलाव (जलाशय), आण्विक चाचणी यांसारख्या मानवी उपक्रमांमुळे देखील भारतामध्ये भूकंपाची स्थिती निर्माण होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.