सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे स्वत:साठी वेळ काढायचा असेल, तर सोशल मीडियापासून काही दिवस लांब राहणे शिकायला हवे. किमान आठवडाभर तरी सोशल मीडियापासून लांब राहण्याच्या प्रकाराला डिजिटल डिटाॅक्स असे म्हणतात. असा हा डिजिटल उपवास केल्यास वैफल्य, अस्वस्थता यांचे प्रमाण कमी होते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
डिजिटल डिटाॅक्स म्हणजे?
- आजकाल सर्वचजण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सोशल मीडिया मंचाशी जोडले गेले आहेत.
- त्यातही व्हाॅट्सअॅप, फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम इत्यादींचा वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे.
- या सर्व सोशल मीडिया मंचांच्या वापराचा अतिरेक होतो आणि मानसिकता बिघडण्याचे प्रमाण वाढते.
- या प्रक्रियेला डिजिटल डिटाॅक्स असे म्हणतात.
काय सांगते संशोधन?
- ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या संशोधनानुसार, 18 ते 72 वयोगटातील 154 लोकांवर प्रयोग केला.
- या लोकांना दोन गटांत विभागण्यात आले. त्यातील एका गटाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यात आले.
- अन्य गटाला सोशल मीडिया वापरण्याची परवानगी देण्यात आली. या गटातील लोकांनी आठवडाभर सरासरी आठ तास सोशल मीडियावर घालवल्याचे निदर्शनास आले.
- दोन्ही गटांतील लोकांवर तीन प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या.
- त्यात ज्या लोकांनी सोशल मीडियाचा वापर केला नाही त्यांची मानसिक स्थिती स्थिर दिसली तर ज्यांनी वापर केला त्यांच्यात अस्वस्थता, नैराश्य वगैरची लक्षणे दिसली.
( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का?)
भारतातील सद्य: स्थिती
- भारतात 65 कोटी नागरिक या ना त्याप्रकारे सोशल मीडियाचा वापर करतात.
- इंटरनेट स्वस्त असल्याने लोकांचा वापर वाढला आहे.
- सोशल मीडियाचा वापर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रणाणात वाढला आहे.
- 16 ते 44 या वयोगटातील 97 टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात.