Aditya Thackeray यांना टँकर मालकांचा एवढा पुळका का?

100
Aditya Thackeray यांना टँकर मालकांचा एवढा पुळका का?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबईतील विहिरींमधील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकर मालकांकडून संपाची हाक दिली असून यासाठी स्वत: शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भारत सरकारच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाची एनओसी नसल्याने विहिर मालकांना नोटीस जारी केल्या आहे. मात्र, टँकर मालकांना तथा चालकांना कोणतीही नोटीस नसताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे टँकर मालकांची बाजू का घेतात? टँकरवाल्यांचा पुळका आदित्य ठाकरेंना का आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – Water : पाणी भरले जाते विहिरींचे; टँकरवर लिहिले जाते ‘आरओ’ वॉटर)

शिवसेना उबाठाचे नेते, माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून टँकर मालकांनी पुकारलेल्या संपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबई टँकर असोसिएशनने आज संपाची हाक दिली असून, पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ह्या दिवसांत अनेक गृहनिर्माण सोसायट्या, उंच इमारती, चाळी, व्यावसायिक कार्यालये आणि उद्योगांना ह्याचा फटका बसणार आहे. भारत सरकारच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाने बल्क वॉटर सप्लायर्ससाठी ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत, त्यातील अडचणी सोडवल्या जाव्या, ह्या मागणीसाठी असोसिएशन आंदोलन करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित असून, महाराष्ट्र सरकारने तो अजूनही केंद्र सरकारकडे गांभीर्याने मांडलेला नाही. आज दिल्लीतील सरकारी कार्यालयांत बसून बनवलेल्या काही अव्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वांमुळे मुंबईकरांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.

(हेही वाचा – परीक्षेचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल; Mumbai University कडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन)

विशेष म्हणजे सन २०२१ आणि त्यानंतर २०२२ मध्ये राज्यात शिवसेना उबाठाची सत्ता होती. त्यावेळेला खासगी विहिरी मालकांना याबाबत नोटीस जारी केल्यानंतर त्यांनी संपाचा इशारा दिला होता आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार तत्कालिन आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मौखिक आदेश दिल्यानंतर याला स्थगिती दिली होती. परंतु, त्यानंतर विहिर मालकांनी कोणत्याही प्रकारची एनओसी सादर केली नाही तसेच प्रशासनाच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले. विहिर मालक एकाबाजुला खासगी टँकरच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करत असताना दुसरीकडे यासाठीचे नियम पाळायला तयार नसल्याने महापालिकेने अखेर पाऊल उचलले. परंतु पुन्हा एकदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यात उडी मारत याला विरोध दर्शवला. महापालिकेने कुठेही टँकर मालकांना नोटीस दिलेली नसून विहिर मालकांनाच नोटीस दिलेली असताना टँकर मालक संप का करतात आणि त्यांच्या संपाबाबतची भीती आदित्य ठाकरे का व्यक्त् करतात असा सवाल उपस्थित केला जात आहे. आदित्य ठाकरे हे मंत्री असताना त्यांना विहिर मालकांसाठी काही करता आलेले नाही. उलट पुन्हा संप पुकारल्यानंतर राज्यातील सरकारलाच याचा दोष देत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा टँकर मालकांना पूर्ण पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.