पुण्याचा Ring Road प्रकल्प का रखडला? अजून किती भू संपादन करणे गरजेचे?

112

रिंगरोडसाठी (Ring Road) आवश्यक सुमारे २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन अद्याप बाकी आहे. त्यासाठी आणि यापूर्वीच्या निवाड्याचा मोबदला देण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. ती पूर्ण करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. जमीनमालकांनी संमतीने जमीन दिल्यास बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जाणार आहे. त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्यासंदर्भात संसदेत केलेलं विधानं बाहेर येऊन करून दाखवा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान )

रिंगरोडच्या (Ring Road) प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नुकतीच बैठक घेतली. या वेळी भूसंपादन समन्वयक कल्याण पांढरे आणि विविध ठिकाणचे भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. या रिंगरोडसाठी १ हजार ७४० हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी सुमारे १७० हेक्टर सरकारी जमीन आहे, तर पूर्व भागातील ४७ गावांमधून ८५८.९६ हेक्टर, तर पश्चिम भागातील ३६ गावांतील ६४४.११ हेक्टर असे १५०३.०७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील सुमारे १३०० हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे, तर पूर्व भागातील १४३ आणि पश्चिम भागातील ६३ हेक्टर म्हणजेच २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन शिल्लक आहे. (Ring Road)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.