- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेचे सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या आणि मंडईंच्या पुनर्विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात बोरीवली पश्चिम येथील बाभई मासळी बाजार आजही बैठ्या आणि टेकू लावलेल्या जागेमध्ये वसलेला आहे. या बाभई मासळी बाजाराची दुरुस्ती तथा कोणत्याही चांगल्याप्रकारची सुविधा दिली जात नसल्याने आजही येथील मासळी बाजारात दुरावस्था झाली आहे. परिणामी घाणीच्या साम्राज्यात कोळी भगिनींना व्यवसाय करावा लागत असून स्थानिकांनाही या असुविधेचा त्रास सहन करावा लागत आहे. (BMC Market)
(हेही वाचा – ब्रिटिश संसदेत Bangladesh Violence मुद्यावर झाली चर्चा; काय म्हणाले खासदार?)
बोरीवली पश्चिम येथील बाभई येथील बाभई मासळी बाजाराच्या जागेत सुमारे २० ते २५ कोळी महिला मासळी विक्रीचा व्यवसाय करत असून याच ठिकाणी चिकन आणि मटन विक्रेत्यांचेही स्टॉल्स आहे. मासळी बाजाराच्या जागेचा मागील अनेक वर्षांपासून विकास झालेला नसून या बाजाराच्या वास्तू दुरुस्ती तथा सुधारणा करण्यात आलेली नाही. या मासळी बाजाराची दगडी सुरक्षा भिंत कोसळून पडलेली आहे. तर आती बैठ्या शेडचे बांधकाम हे टेकूवर आधारीतच आहे. त्यामुळे याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मासळी विक्रेत्या कोळी बांधवांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. (BMC Market)
(हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना Raj Thackeray यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले, पुढील ५ वर्ष… )
एकप्रकारे असुविधा असलेल्या बाभई महापालिका मार्केटचा विकास न झाल्याने अत्यंत घाणीच्या साम्राज्यात कोळी बांधवांना व्यवसाय करावा लागत आहे आणि याच वातावरणात स्थानिकांना तिथे जाऊन मासळी खरेदी करावी लागते. त्यामुळे आतील बाजूस जाऊन मासळी खरेदी करायला न जाता बाहेरुनच खरेदी करावे लागत आहे. तसेच आतील बाजूस गैरसोय असल्याने बऱ्याच कोळी भगिनी या बाहेर रस्त्यावर बसून व्यवसाय करत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नसून एका बाजूला मार्केटचा पुनर्विकासाला गती देण्याचा प्रयत्न होत असताना बाभई महापालिका मार्केटकडे दुर्लक्ष का असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. (BMC Market)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community