Muslim Hawkers : दादरमध्ये का वाढतात मुस्लिम फेरीवाले? जाणून घ्या कारण

79
दादरमध्ये का वाढतात मुस्लिम फेरीवाले, जाणून घ्या कारण?
  • प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय घेत मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांवर कारवाई सुरु होती. मात्र, ही कारवाई थांबल्यानंतर दादर भागात काही मुस्लिम फेरीवाल्यांची (Muslim Hawkers) संख्या वाढताना दिसत असून या समाजाच्या लोकांची संख्या वाढण्यामागील कारण समोर येत आहे. दादर भागात अनेक मूळ फेरीवाले हे जागा भाड्याने देत असून या समाजातील लोक हे इतरांपेक्षा जास्त भाडे देत असल्याने भाड्याच्या अधिक रकमेच्या लालसेने मुस्लिम फेरीवाल्यांना जागा भाड्याने दिली जात असल्याचे बोलले जात आहे. दादरमध्ये अनेक जागा या भाड्याने दिल्या जात असल्याने अधिक पैसे मिळत असल्याने आपण कुणाला जागा भाड्याने देता यापेक्षा अधिक पैसे मिळतो हेच पाहिल्याने दादरमधील भाडोत्री फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Hikmat Udhan : जालन्यात ठाकरे गटाला खिंडार, सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण करणार शिवसेनेत प्रवेश)

दादर पश्चिम भागांमध्ये काही प्रमाणात मागील काही दिवसांपासून मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, हे मुस्लिम फेरीवाले (Muslim Hawkers) दादरमध्ये येऊन थेट व्यवसाय थाटत नसून ते जागा भाड्याने घेतात. या जागा भाड्याने घेण्यासाठी ते अधिक पैसे मोजतात. हे बाहेरुन येणारे फेरीवाले अधिक भाडे देत असल्याने स्थानिक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास जागा दिल्या जात नाही. त्यामुळे भाड्याचे जास्त पैसे देत मुस्लिम फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात असे येथील स्थानिक फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – विधानसभा जागा वाटपावर DCM Devendra Fadnavis यांचा आत्मविश्वास; महायुतीचा ‘पेपर’ जवळपास पूर्ण)

दादरमध्ये मूळ फेरीवाला हा व्यवसाय करत नसून अधिकच्या जागा भाड्यानेच दिलेल्या आहेत.त्यामुळे या जागा बाहेरील फेरीवाले भाड्याने घेऊन व्यवसाय करत असल्याने स्थानिकांच्या तुलनेत बाहेरील फेरीवाल्यांची संख्या दादरमध्ये अधिक दिसून येत आहे. तसेच महापालिका आणि पोलिस यांची विशेष काळजी हे भाडोत्री फेरीवाले घेत असल्याने त्यांनाच अधिक संरक्षण दिले जात असल्याचेही बोलले जात आहे. स्थानिक फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी जर प्रत्येक फेरीवाल्यांना गाडी बसवून जोवर जागेचा मूळ फेरीवाला येत नाही तोवर सोडणार नाही असा निर्धार केला तर मूळ फेरीवाला कोण आणि भाडोत्री कोण हे शोधणे सोपे जाईल आणि भाडोत्री फेरीवाले शोधण्यासाठी पोलिसांनी याच पद्धतीचा वापर करावा असेही फेरीवाल्यांमधून बोलले जात आहे. (Muslim Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.