पोपट पाळणे हा गुन्हा, अशी होऊ शकते शिक्षा

325

एका प्रसिद्ध मराठी शोमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने आपल्याकडे पाच पोपट असल्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर रिअ‍ॅलिटी यावरुन पक्षीप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. पोपट हा पाळीव पक्षी नाही याबाबत अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे आता मोठ्या स्तरावर जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणीही पक्षीप्रेमींनी केली आहे. वनविभागानेही राज्यस्तरावर पोपटांविषयी जनजागृती करण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

वन्यजीव कायद्यानुसार बंदी

घनदाट जंगलासह शहरात सर्वत्र आढळणारा पोपट हा पक्षी भारतीय वन्यजीव कायद्यानुसार संवर्धित आहे. दुर्दैवाने याबाबतची माहिती फारशी कुणाला नाही. परिणामी, आजही घरात पोपट पाळण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसून येते. एका मराठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये पोपट पाळल्याची कबुली दिल्याचे प्रकरण स्पर्धेतील स्पर्धकाच्या अंगलट येताच पोपटाविषयीची जनजागृती, कायदे याबाबतचा विषय पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.

(हेही वाचाः आधार कार्डला कसे लिंक कराल व्होटिंग कार्ड? केंद्र सरकारचा नवा नियम)

अशी आहे शिक्षा

पोपटाची अवैधरित्या तस्करी तसेच शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यास नियमानुसार २५ हजार रुपये दंड तसेच ३ वर्षांचा तुरुंगवास अशी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईपेक्षाही निदान कायद्याचा धाक लक्षात घेत पोपट वनविभागाकडे स्वतःहून सुपूर्द केल्यास कडक कारवाईतून सूट मिळू शकते, असा मुद्दाही वनाधिका-यांनी मांडला आहे. तस्करीच्या प्रकरणात मात्र कठोर कारवाई केली जात असल्याची माहती वनाधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.