हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॅार्मवर क्रिकेटचे समालोचन मराठी भाषेत होत नसल्याने मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज थेट हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात पोहोचले. (Hotstar)
हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाब विचारला. हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? हा जाब त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना विचारला. अमेय खोपकर (Amey Khopkar), संतोष धुरी, केतन नाईक हे नेते हॉटस्टारच्या कार्यालयात पोहोचलेत. पोलीस देखील कार्यालयात उपस्थित आहेत. (Hotstar)
हेही वाचा-Pune News : पुणे विभागाच्या मद्यपान तपासणी मोहिमेअंतर्गत तीन एसटी चालकांचे निलंबन
यावेळी अमेय खोपकरांनी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना फोन लावला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अमलबजावणी होईल असे लेखी पत्र घ्या, अशी मागणी खोपकरांनी केली. उदय सामंत यांनी मनसेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. संजोग गुप्ता कुठे आहे, त्याला तुम्ही बोलवा किंवा आम्ही जाऊन आणू असं मनसे नेते म्हणाले. (Hotstar)
हेही वाचा-‘कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता तर …’ , Donald Trump सत्तेवर येताच CIA चा चीनवर निशाणा
“मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये? हे कोण ठरवणारे, बाकीच्या भाषांची असावी आणि मराठीची नसावी, बाकीच्या भाषांचा आदर आहेच. पण मराठीत कॉमेंट्री असावी हे शंभर टक्के बरोबर आहे.” असं उदय सामंत यांनी सांगितलं. त्यावर ‘साहेब मी इथून पत्र घेऊन निघतो. काही असेल तर फोन करतो.’ असं अमेय खोपकर म्हणाले आहेत. (Hotstar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community