मेट्रोच्या ट्रॅकवर का दिसत नाहीत खडी किंवा दगड? जाणून घ्या कारण

109

मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकल ट्रेन आणि मेट्रो ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देण्यात येते. आता लोकल ट्रेन आणि मेट्रोच्या रचनेत मोठा फरक आहे. अगदी ट्रेनच्या डब्यांपासून ते रेल्वे ट्रॅक स्टेशनच्या उभारणीत अंतर असल्याचे आपल्याला माहीत आहे.

आता सर्वात मोठा फरक म्हणजे लोकल ट्रेन किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वे ट्रॅकमध्ये आपल्याला करड्या रंगाची खडी टाकलेली दिसते, पण मेट्रो ट्रेनच्या ट्रॅकमध्ये आपल्याला एकही दगड दिसत नाही, असे का? असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. त्याचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

(हेही वाचाः 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील ‘या’ लोकल होणार 15 डब्यांच्या, बघा संपूर्ण यादी)

ट्रॅकवर का असतात खडी?

रेल्वे ट्रॅक्सवर टाकण्यात येणा-या दगडांना बैलेस्ट असे म्हटले जाते. ट्रॅकवरुन जेव्हा वेगाने ट्रेन जाते तेव्हा ट्रॅकमध्ये मोठ्या प्रमाणावर कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे रेल्वे ट्रॅकच्या खाली असलेले स्लिपर्स उखडू नयेत म्हणून ट्रॅकमध्ये खडी टाकण्यात येतात. त्यामुळे ट्रॅक मेन्टनन्ससाठी लागणारा वेळ आणि खर्च दोन्ही जास्त आहेत.

मेट्रो ट्रॅकचे वैशिष्ट्य काय?

याउलट मेट्रोच्या ट्रॅकमध्ये खडी नसल्यामुळे त्यांचा मेन्टनन्स करणे तुलनेने सोपे असते. कारण मेट्रोचे संपूर्ण ट्रॅकच काँक्रीटचे बनलेले असतात. त्यामुळे ते अधिक मजबूत असतात. मेट्रो रेल्वेच्या स्टेशन्समधील अंतर देखील खूप कमी असल्याने संपूर्ण काँक्रीटचे ट्रॅक हे परवडणारे असतात.

(हेही वाचाः आता रेल्वेमध्येही मिळणार मराठमोळी पुरणपोळी, ‘असा’ आहे IRCTC चा नवा मेन्यू)

तसेच मेट्रो ट्रेन या लोकल किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्यांपेक्षा कमी वेगाने धावत असल्याने निर्माण होणारी कंपने देखील मर्यादित असतात. कंपने नियंत्रित करण्यासाठी मेट्रोचे ट्रॅक हे विविध पद्धतीने डिझाईन करण्यात येतात. मेट्रो ट्रॅक हे काँक्रीटचे बनले असल्याने त्यांना येणारा खर्च हा जास्त आहे, पण त्यांच्या मेन्टनन्ससाठी लागणारा खर्च आणि वेळ खूप कमी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.