६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?

190
६ डिसेंबर जसा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन म्हणून ओळखला जातो, तसेच आता हा दिवस शौर्य दिवस म्हणूनही साजरा केला जाऊ लागला आहे. कारण ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील बाबरी मशीद लाखो कारसेवकांनी जमीनदोस्त केली होती. त्याची नेटकरी आठवण करून देत याचे वर्णन शौर्य दिवस म्हणून करत आहेत.
अमित राजवत म्हणतात, ६ डिसेंबर १९९२, शौर्य, सन्मानाची ३० वर्षे. जे पाडले तिथे पुन्हा नव्याने उभे राहणार. जे त्यांनी सुरु केले आम्ही त्याचा शेवट केला. जय श्रीराम.

तर आशुतोष सोनी म्हणतात की, ६ डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली नव्हे, तर 6 डिसेंबर 1992 रोजी हिंदूंनी श्री रामजन्मभूमी पुन्हा मिळवून दिली. शांतताप्रिय लोक याला #Blackday म्हणतात पण प्रत्यक्षात बाबरने त्याचे मशिदीत रूपांतर केले तो काळा दिवस होता, संपूर्ण मुघल काळ काळा युग आहे. काशी आणि मथुरा बाकी आहे!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.