पूर्व उपनगरातील लाल बहादुर शास्त्री मार्ग अर्थात एल. बी. एस. मार्ग, अंधेरी घाटकोपर लिंक रोड आणि गोळीबार रोड या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. आणि त्यावरील अतिक्रमणे हटवून रिकाम्या झालेल्या, रुंदीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या जागेचा विकास केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातूनच रुंदीकरण केलेल्या रस्त्याच्या जागेची आता सुधारणा केली जाणार आहे.
घाटकोपर भागातून जाणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि रुंदीकरण केलेल्या भागाचा सुधार करण्याचे काम पहिल्या टप्प्यात पुर्ण झाले आहे. या मार्गावर एकूण ५९८ एवढी बांधकामे बाधित होती, त्यातील १५३ बाधित बांधकामे वगळता उर्वरित सर्व बांधकामे तोडल्याने या रिकाम्या झालेल्या जागेच्या आधारे रुंदीकरण करण्यात आले आणि त्या भागाची सुधारणाही करण्यात आली. परंतु रस्त्यावरील सुमारे दीडशे बांधकामे हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही बाधित बांधकामे हटवण्यात आल्यानंतर त्या रुंदीकरणाच्या दृष्टीने त्या रस्त्याच्या भागाचा सिमेंट काँक्रिट द्वारे विकास करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – ISRO PSLV-C56 : चांद्रयान-३ नंतर इस्त्रो नव्या मोहीमेसाठी सज्ज, PSLV-C56 चे ‘या’ तारखेला होणार प्रक्षेपण)
त्यामुळे एल. बी. एस. मार्ग आणि या परिसरातील अंधेरी घाटकोपर मार्ग व गोळीबार रोड येथील काही ठिकाणी बाधित बांधकामे हटवली जाणार आहेत. ही बांधकामे हटवल्यानंतर त्या भागाची सुधारणा केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या सुधारणा करण्याच्या कामासाठी विविध करांसह सुमारे ३७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community