अरे व्वा! चक्क लोकलमध्ये मिळणार वायफाय

112

प्रवासात आपल्या मोबाईलमधला डेटा नेटवर्क अडचणींमुळे नीट चालत नाही. त्यामुळे ऑफिससाठी निघालेल्या नोकरदारांची महत्त्वाची कामे खोळंबतात. म्हणूनच लोकल ट्रेनच्या डब्ब्यात वायफाय बसवण्याचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. आता लोकलच्या प्रवाशांना नवीन वर्षाचे गीफ्ट मिळणार आहे, लोकलमध्ये मोफत वायफाय सेवा प्रवाशांना देण्यात येणार आहे.

वायफाय लावण्याचे काम सुरु

मुंबईच्या लोकलमध्ये प्री-लोडेड इंटरनेट सेवा देण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. पण, काही कारणास्तव तसेच, कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला होता. आता रेल्वेने या प्रकल्पाला राबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असून, नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहे. मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यात एका खाजगी कंपनीमार्फत वायफाय लावण्याचे काम सुरु आहे.

प्रवाशांना होणार फायदा

‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणा-या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाण्यांचा समावेश असेल. प्रवाशांना फक्त मोबाईल वायफाय लॅागइन केल्यानंतर, प्री लोडेड माहिती मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली होती. आता प्रवाशांची संख्या वाढून 64 लाखांपर्यत गेली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

 ( हेही वाचा : मलिकांना पुन्हा झाली पाहुण्यांची आठवण! म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.