केंद्र सरकारने विकिपीडियाला पक्षपाती माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी दि. ५ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये विकिपीडियातील (Wikipedia) चुका आणि पूर्वग्रहावर आधारित माहिती प्रसारित केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
विकिपीडिया (Wikipedia) जगभरातील लाखो लोक वापरतात. ही एक खुली वेबसाइट आहे, जिथे कोणीही माहिती अपडेट करू शकतो. हे प्लॅटफॉर्म बऱ्याच काळापासून विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे, परंतु आता प्लॅटफॉर्मने वापरकर्त्यांकडून पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. आजकाल भारतात विकिपीडियावर (Wikipedia) बंदी असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. अशातच भारत केंद्र सरकारने विकिपीडियाला (Wikipedia) नोटीस पाठवली आहे.
( हेही वाचा : Ajit Pawar Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहे वेगळेपण?)
केंद्र सरकारने विकिपीडियाला (Wikipedia) नोटीस का पाठवली?
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने म्हटलं आहे की, विकिपीडियाविरोधात (Wikipedia) पक्षपाताच्या अनेक तक्रारी आणि वेब पेजवर चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसमध्ये गेल्या काही महिन्यांत विकिपीडियाविरोधात (Wikipedia) केलेल्या तक्रारी आणि पक्षपात यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. विकिपीडियाला चुकीच्या माहितीसाठी मध्यस्थ व्यतिरिक्त प्रकाशक का मानले जाऊ नये, याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे विकिपीडियावर काय परिणाम होणार आणि विकिपीडिया (Wikipedia) भारतात बॅन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा :