मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्याने नव्या वादात सापडलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय गवाडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना सर्वोच न्यायालयाने १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर रहावे आणि जामिनासाठी नव्याने अर्ज करावा, असा आदेश दिला आहे, त्यामुळे गावडे यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. सध्या गावडे हे त्यांच्यावरील विविध गुन्ह्याच्या खाली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे बाहेर आहेत
१५ दिवसांची दिली मुदत!
नालासोपारा येथे राहणारे धनंजय गावडे यांच्यावर खंडणी उकळणे, बलात्कार, धमकावणे, फसवणूक असे विविध प्रकारचे १० गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्याखाली त्यांना २०१७ साली अटक करण्यात आली होती. दोन वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने गावडे यांना सशर्त जामीन दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी नवा आदेश दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने पुढच्या १५ दिवसांत पोलिसांना शरण जावे, त्यांचा विशेष अर्ज फेटाळून लावत उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाही. जामिनासाठी नवीन अर्ज दाखल करा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
नालासोपऱ्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खंडणीसह अनेक गुन्हे असलेला आणि सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे.
https://t.co/wMkGye93WR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 28, 2021
मनसुख हिरेन प्रकरणी झालेला आरोप!
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत सचिन वाझे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यात ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मिळाले ते शिवसेनेचे एकेकाळचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्या घराच्या शेजारी सापडले. २०१७च्या खंडणीच्या आरोपाखाली गावडे यांना अटक करण्यात आली होती, तेव्हा त्या प्रकरणात आणखी एक आरोपी हे पोलीस अधिकारी सचिन वाझे होते. या सर्व गोष्टींचा एकमेकांशी संबंध असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
(हेही वाचा : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण : धनंजय गावडेंवरही आरोप! कोण आहेत गावडे?)
काय म्हणाले होते फडणवीस?
- मनसुख हिरेन हे धनंजय गावडे यांना शेवटचे भेटले होते. त्या ठिकाणावरून ४० किलोमीटर अंतरावर हिरेन यांचा मृतदेह सापडला.
- धनंजय गावडे यांच्यावर २०१७ साली खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला. अटकपूर्व जामीन घेऊन ते बाहेर पडले आहेत.
- या आरोपात दुसरा आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आहेत.
- मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे धनंजय गावडे यांच्या घराशेजारचे आहे.
- त्या लोकेशनपासून ४० किमी अंतरावर हिरेन यांचा मृतदेह सापडला. गावडे यांना मनसुख हिरेन यांची भेट घेण्याचे कारण काय?
कोण आहेत धनंजय गावडे?
- वसई-विरार महापालिकेत धनंजय गावडे हे शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यानंतर ते गटनेते बनले. पुढे पक्षात त्यांना मोठी जबाबदारी देत पालघर जिल्ह्याचे उपजिल्ह्याप्रमुख बनले.
- खंडणी, फसवणूक, ब्लॅकमेल आणि बलात्कार यांसारखे गावडे यांच्यावर दहा गुन्हे नोंद आहेत.
- ३१ मार्च ते १२ एप्रिल २०१८ यादरम्यान गावडे यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झाले आहेत.
- माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवून विकासकांना धमकी देत खंडणी वसूल करीत असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
- २०१७ मध्ये गावडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.