Manorama Khedkar यांचा शस्त्र परवाना रद्द होणार?

पुणे पोलिसांच्या नोटिसीला मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

134

हातात पिस्तूल घेऊन जमिनीच्या वादातून स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे. तुमच्या बंदुकीचे लायसन्स जप्त का करण्यात येऊ नये, असा प्रश्न करणारी नोटीस पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना बजावलेली आहे. पुणे पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी मुळशीमध्ये शेतीच्या वादातून स्थानिक शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करणारा व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये हातात छोटे पिस्तूल घेऊन बाउन्सरच्या मदतीने शेतकऱ्यांना धमकावताना मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) दिसत असल्याचा दावा करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या व्हिडीओची सत्यता पडताळली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा Digital भिकाऱ्यांच्या सापळा; सायबर क्राईममधील नवीन फ्रॉड)

मनोरमा खेडकर यांचे मौन 

पुणे पोलिसांच्या नोटिसीला मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी पुण्यातील बाणेर रोडवरील खेडकर यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर नोटीस लावली आहे. नोटीस देण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे पुणे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जमिनीसाठी पोलिसांवर दबाव

खेडकर कुटुंबाची मुळशीत सुमारे २५ एकर जमीन आहे. या जमिनीच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा खेडकर कुटुंबावर आरोप आहे. याच प्रकरणात खेडकर कुटुंबाने पोलिसांवर दबाव टाकल्याचे पुणे ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.