मालदीवचे राष्ट्रपती मोहंमद मुइज्जू यांनी सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा भारतविरोधी वक्तव्य केले आहे. ‘कोणत्याही देशाला मालदीवच्या सार्वभौमत्वात हस्तक्षेप करू दिला जाणार नाही’, असे मुइज्जू भारताचे नाव न घेता म्हणाले. (Maldives President Mohamed Muizzu)
(हेही वाचा – Public Works Department: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय)
कराराचे नूतनीकरणही करणार नाही
भारतासोबतच्या चर्चेत असे ठरले आहे की, त्यांचे सर्व 80 भारतीय सैनिक 10 मेपर्यंत भारतात परततील. भारताचे तीन एव्हिएशन प्लॅटफॉर्म आहेत. यापैकी एकावर उपस्थित असलेले सैनिक 10 मार्चपर्यंत भारतात परततील. यानंतर आणखी २ प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले भारतीय सैनिक 10 मेपर्यंत त्यांच्या देशात जातील. मालदीव भारतासोबत जलसंशोधन कराराचे नूतनीकरणही करणार नाही. आम्ही कोणत्याही देशाला आमच्या सार्वभौमत्वात हस्तक्षेप करू देणार नाही, असे मुइज्जू यांनी म्हटले आहे.
2 विरोधी पक्षांचा विरोध
मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष, मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (Maldivian Democratic Party, एमडीपी) आणि डेमोक्रॅट्सने मुइज्जूंच्या या संबोधनाचा विरोध केला आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर मुइज्जू यांनी भारतविरोधी वक्तव्य केले होते. त्यानंतर भारतभरात उसळलेल्या संतापामुळे मुइज्जू यांना त्यांच्या देशातच विरोध होऊ लागला. सध्या त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून महाभियोग चालवण्याची तयारी चालू आहे. (Maldives President Mohamed Muizzu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community