HAMAS नष्ट होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही; इस्रायलचा इशारा

65

इस्रायल लढेल आणि जिंकेल. हमासने ओलीस ठेवलेल्या आमच्या लोकांना आम्ही परत आणू. हमासने आमच्या शहरांवर आक्रमण केले, आमच्या लोकांना मारले, आमच्या महिलांवर अत्याचार केले आणि आमच्या प्रियजनांचे अपहरण केले. हमासचा (HAMAS) नाश होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही किंवा शांत बसणार नाही, असा पुनरूच्चार इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी केला. इस्रायलने १९ जानेवारीपासून चालू केलेला हमासविरुद्धचा युद्धविराम संपवला आहे. इस्रायलने १८ मार्चपासून पुन्हा चालू केलेल्या आक्रमणात गाझा पट्टीमध्ये (Gaza Strip) ४०० हून अधिक लोक ठार झाले आहेत.

(हेही वाचा – नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या ‘Auto-taxi’ चालकांची तक्रार करा ‘या’ व्हाट्सअप क्रमांकावर  )

१८ मार्चच्या रात्री पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात ४० सहस्रांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले. गुप्तचर संस्थेचे प्रमुख शिन बेट रोनेन बार यांना हटवण्याच्या निर्णयाचा लोक निषेध करत आहेत.

गाझा पट्टीमध्ये जिहादी आतंकवादी संघटना हमासकडून सरकार चालवले जात होते. या सरकारमध्ये पंतप्रधान असणारा आतंकवादी इस्साम दिब अब्दुल्ला अल्-दलिस याला इस्रायलने ठार मारले. अब्दुल्लाकडे हमासच्या संघटना आणि आतंकवादी कारवाया यांची जबाबदारी होती. गेल्या २४ घंट्यांत इस्रायलने आक्रमण करून हमासच्या (HAMAS) ३ प्रमुख आतंकवाद्यांना ठार मारले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.