Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

196
Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष
Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे न्यायालयात (Pune Sessions Court) हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. समन्स मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्या विरोधात अटकेचे वॉरंट निघू शकते, असे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या २०० अन्वये तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास कमाल दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.

(हेही वाचा – … तर कारसेवा पुन्हा करू; MLA Nitesh Rane यांचा हल्लाबोल)

काय आहे प्रकरण ?

गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम २०२’नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. याची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती.

अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे नमूद केले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी १९ ऑगस्टला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.