पहिल्या सत्र चाचणी परीक्षेनंतर मिळणार महापालिका शाळांच्या मुलांना शालेय साहित्य?

88

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालेय वस्तूंचे वाटप अद्याप झालेले नाही. दरवर्षी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. परंतु यंदा या वस्तू खरेदीचे प्रस्तावच मंजूर झालेले नसून परिणामी या सर्व शालेय वस्तूंचे वाटप मुलांना पहिल्या चाचणी परीक्षेतनंतर प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांना पाठ्यपुस्तके मिळाली असली तरीही वह्या आणि इतर वस्तू या सत्र परीक्षेनंतर मिळणार असल्याने मुलांना आता अभ्यास करावा लागणार आहे.

शालेय साहित्य यंदा तरी मुलांना उशिराने मिळण्याची शक्यता

मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सन २००७ पासून २७ शालेय वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासून या वस्तूंचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाते. मागील काही वर्षापासून शाळेच्या पहिल्या दिवशीच २७ शालेय वस्तूंचे वाटप होत आहे. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतरही याबाबतचे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे हे शालेय साहित्य यंदा तरी मुलांना उशिराने मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेने या वस्तूंच्या खरेदीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये कार्यादेश दिल्यानंतर ४५ दिवसांमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारची अट घातलेली आहे. त्यामुळे याबाबतचे तीन प्रस्ताव महापालिका प्रशासक यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवले आहेत. परंतु या प्रस्तावाला अद्यापही मान्यता मिळालेली नाही. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या वस्तूंच्या खरेदीचे आदेश कंत्राटदारांना बजावते जातील आणि त्यानंतर पुढील ४५ दिवसांमध्ये हे शालेय साहित्य शाळांमध्ये वितरित करण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची असणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर या कंत्राटदारांचा पुढील ४५ दिवसाचा अवधी गृहीत धरला तर ऑगस्ट महिन्यातच या साहित्याचे उपलब्ध होऊ शकेल असे दिसून येते.

( हेही वाचा : मुख्य लिपिक पदाची २६ जून रोजी परीक्षा; नावे  नोंदवण्याची आजची अंतिम तारीख )

महापालिकेच्यावतीने वह्या पेन्सिल व इतर स्टेशनरी आणि रेनकोट आदींच्या साहित्य खरेदी चे प्रस्ताव निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रशासकाकडे पाठवले आहेत. या प्रस्तावांना अद्यापही मंजुरी नाही. त्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जेव्हा कार्या देश बजावल्यानंतर पुढील ४५ दिवसांचा कालावधी गृहीत धरला जाईल. त्यामुळे सध्या जरी मुलांना पाठ्यपुस्तके दिली असली तरी त्या मुलांना जुन्या वह्यांचा वापर करावा लागेल किंवा हे साहित्य खरेदी करून वापर करावा लागणार आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना पत्र घेऊन दप्तर खरेदीला झालेला विलंब निदर्शनास आणून दिली होती.

या दप्तर खरेदीला फेब्रुवारी महिन्यात निविदा काढल्यानंतर तब्बल चौदा वेळा शुद्धिपत्रक काढण्यात आली आहे. ही शुद्धिपत्रके काढण्यातच वेळ वाया घालवला गेला आहे. परिणामी दप्तरे सुद्धा मुलांना पुढील सप्टेबर महिन्यानंतर मिळतील की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जर हे पाठ्यपुस्तक दिली असली तरी मुलांना गेल्या वर्षीची जुनी फाटकी दप्तरे घेऊन जावे लागणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.