-
सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजित नि:क्षारीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पाच्या कामांसाठी कंत्राटदाराच्या नेमणुकीचा प्रक्रिया सुरु आहे. मात्र, या प्रकल्पात समुद्राचे पाणी गोडे करण्याची प्रक्रिया केल्यानंतर त्यातील शिल्लक पाणी अशाचप्रकारे वाहून घालण्याऐवजी या प्रकल्पातून मीठ उत्पादन करण्याची शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Desalination Water)
मुंबई महानगरातील पाण्याची वाढती गरज पाहता नियोजित निःक्षारीकरण (समुद्राचे पाणी गोडे करणे) प्रकल्प महापालिकेच्यावतीने राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आल्यानंतर याचा विस्तृत आराखडा बनवून या कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली. या कंत्राटदाराच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. (Desalination Water)
समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या या सुमारे २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन नि:क्षारीकरण प्रकल्पाकच्या बांधकामाचा खर्च रुपये १,६०० कोटी आणि २० वर्षांचा प्रचालन व परिरक्षण खर्च १९२० कोटी रूपये इतका असा एकूण खर्च रुपये ३,५२० कोटी अंदाजित केला आहे. या प्रकल्पातून ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल अशाप्रकारे या प्रकल्पाची रचना केली जाणार आहे. (Desalination Water)
(हेही वाचा – Mahila Bachat Gat : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन महानगरपालिका मुख्यालयात)
या प्रकल्पाबाबत शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी करण्याच्या प्रकल्पाबरोबर मीठ उत्पादन करण्याकरता जागा व उर्जा यांची अत्याधिक प्रमाणात आवश्यता भासणार आहे. तसेच समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करताना उरलेले क्षारयुक्त अवजल अर्थात ब्राईन वॉटर पर्यावरण संकेतांनुसार खोल समुद्रात डिफ्युजर प्रणालीच्या माध्यमातून निचरा करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे हे पाणी खुल्या जागेत सोडण्याकरता पर्यावरणीय प्राधिकरणाच्या आक्षेप असू शकतो. त्यामुळे पर्यावरण विभागाबाबत याबाबतची चाचपणी करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार याची चाचपणी करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. (Desalination Water)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community