ऑक्टोबरनंतर कोरोनाची तिसरी लाट…काय म्हणाले राजेश टोपे?

अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली, पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही, असे मंत्री टोपे म्हणाले.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे बाजारपेठा, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येण्याची चर्चा सुरूच आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, असे सांगितले.

लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी

टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, त्याचा मोठा परीणाम होणार नाही, असे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली, पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असेही मंत्री टोपे म्हणाले. परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याने शाळा 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण आणि विभाग त्या सूचनेनुसार निर्णय घेईल, असेही टोपे म्हणाले.

(हेही वाचा : पुण्यात पावसाचे धुमशान! 2 तासांत रस्ते पाण्याखाली)

दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचे टार्गेट

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढली तरी तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ‘मिशन कवचकुंडल’अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे, असे मंत्री टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here