Sada Saravankar : भाविकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणार; सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सदा सरवणकर यांचे आश्वासन

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

102
Sada Saravankar : भाविकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणार; सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सदा सरवणकर यांचे आश्वासन

“सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हते. (Sada Saravankar) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवेसनेकडे होते. त्याच विचाराने पूर्वी असलेल्या शिवसेनेकडे ही जबाबदारी आली आहे. ही मोठी जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार, गणेशभक्तांच्या भावना पूर्ण करण्याची संधी आणि गटातटाचा विचार न करता भाविकांना जास्तीत जास्त कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील, याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आमदार सदा सरवणकर यांनी दिले आहे.

(हेही वाचा – National Games 2023 : महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत)

मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddhivinayak Temple Trust) समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या निमित्ताने सरवणकर बोलत होते. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे हे पद अनेक वर्षांपासून होते. आता हे पद शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्याकडे गेले आहे. सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत.

सदा सरवणकर पुढे म्हणाले की, “मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून सिद्धिविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्ष मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या अडचणी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरंच काम करता येईल.” (Sada Saravankar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.