गेल्या अनेक दिवसांपासून थंडीच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच गारठा अनुभवयाला मिळत आहे.तर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याने मुंबईतील वातावरणाचा मोठा बदल केला असून मंगळवारी दिवसभर गारवा होता.तर पुढील पाच दिवसांपर्यंतथंडीचा जोर कायम असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. Weather Update
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात १० अंशाच्या खाली राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी सांताक्रूझ येथील किमान तापमान १६.२ अंशांपर्यंत खाली उतरले. दिवसभरातील मुंबईतील उकडा काहीसा कमी झाल्याने मुंबईकरांना सुखद गारवा अनुभवयाला मिळाला आहे.कोकणपट्ट्यात किमान तापमानात मोठी घसरण नोंदली गेली आहे.रत्नागिरी येथे १६.३ अलिबाग येथे १४.६, डहाणू येथे १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे.Weather Update
(हेही वाचा : Green Hydrogen Project : दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार)
पुढील आठवड्यात थंडीचा जोर कायम राहणार
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, मध्य महाराष्ट्रात मंगळवारी अहमदनगर, नाशिक, जळगाव येथे किमान तापमान १० अंशांखाली उतरले.राज्यात पुढील आठवड्यात असेच किमान तापमान आल्हाददायक असल्यास २६ जानेवारीच्या निमित्ताने मिळालेल्या मोठ्या वीकण्डला अनेकजण सहलींचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community