रविवार, 25 फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये अभिनेत्री केतकी चितळे हिने भाषण केले. त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे आणि ब्राह्मण (Brahmin) ऐक्य परिषदेचे आयोजक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ रविवार, 3 मार्च 2024 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सकल ब्राह्मण (Brahmin) समाज यांच्या वतीने सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान निदर्शने करण्यात आली.
(हेही वाचा Supreme Court : ‘नोट के बदल वोट’ आणि ‘नोट के बदल भाषण’ म्हणणारे आमदार, खासदारावर चालणार खटला)
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने निदर्शने
ब्राह्मण ऐक्य परिषदेनंतर प्रेमनाथ जगतकार यांनी तक्रार केल्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात केतकी चितळे आणि बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या विरोधात कलम २९५ अ आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी सकल ब्राह्मण (Brahmin) समाजाच्या वतीने आयोजित निदर्शनाच्या करण्यात आली. तसेच ब्राह्मण (Brahmin) समाजावरील होणाऱ्या अत्याचारावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी वसंतराव शेवडे, सुभाष फाटक, डॉ. सचिन बोधणी, अविनाश जोशी पालमकर, मंजिरी सहस्त्रबुद्धे, अश्विनी मेहरूनकर, दीपा रंगन, प्रभाकरनजी, रामकृष्ण जोशी पालमकर, श्रीपाद मेहरूनकर, श्रीवत्स जी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाविषयी वाईट बोलणाऱ्या व वारंवार अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तींना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, असे अभिनेत्री केतकी चितळे म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community