कडक लॉकडाऊन तरी सापडले साडेतीन हजार विनामास्क!

संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बहुतांशी प्रमाणात रस्त्यावर फिरत असून त्यांच्याकडूनच मास्क लावण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राज्य सरकारने शुक्रवारी, 9 मार्च रोजी रात्रीपासून सोमवारी, १२ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे रस्त्यांवर फारशी वर्दळ नसली तरीही  एकट्या रविवारी, ११ मार्च रोजी विनामास्कचे साडेतीन हजार नागरीक महापालिकेसह पोलिस पथकाच्या जाळ्यात सापडले. रविवारी दिवसभर संचारबंदी असतानाही ३,६७२ लोकांना मास्क न लावल्यामुळे दंड आकारण्यात आला. तर शुक्रवारी दिवसभरात जमावबंदी असताना सुमारे १३ हजार विना मास्कच्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बहुतांशी प्रमाणात रस्त्यावर फिरत असून त्यांच्याकडूनच मास्क लावण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ७ ते शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी आणि शुक्रवारी रा़त्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन करताना केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु असून उर्वरीत सर्व दुकाने व कार्यालये बंद आहेत. तसेच खासगी कार्यालयांमधील उपस्थितीही ५० टक्के आहे. त्यामुळे सध्या रस्त्यांवर ५० टक्के नागरीक दिसून येत आहे.

(हेही वाचा : आता रुग्णालयातून थेट हॉटेलमध्ये व्हावे लागणार दाखल! मुंबई महापालिकेचा निर्णय)

शुक्रवारी १२ हजार ९४४ लोकांना केलेली कारवाई!

सध्या सुरु असलेल्या विना मास्कच्या कारवाईवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अंशत: लॉकडाऊन करण्यापूर्वी मुंबईत महापालिकेचे २४ प्रभाग, पोलिस, तसेच रेल्वेच्या हद्दींमध्ये मिळून सुमारे १९ ते २० हजार विना मास्कच्या नागरिकांवर कारवाई केली जायची. परंतु शुक्रवारी ९ एप्रिल रोजी झालेल्या कारवाईत १२ हजार ९४४ लोकांना हटकून त्यांच्याकडून २५ लाख ८८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता. यामध्ये महापालिकेच्या बाजार विभागासह क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून ९,६७९ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. तर पोलिसांच्या माध्यमातून ३ हजार ३६ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. रेल्वे हद्दीमध्ये २३४ लोकांवर कारवाई करण्यात आली होती.

रविवारी ७ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल!

रविवारी कडक लॉकडाऊन असलेल्या दिवशी संपूर्ण दिवसभरात ३,६७२ लोकांवर कारवाई करून ७ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या बाजार विभागाच्या कर्मचाऱ्यांसह क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून २,०९७ लोकांना हटकून त्यांना दंड आकारला. तर पोलिसांच्या माध्यमातून १,४२७ लोकांवर कारवाई केली. शिवाय रेल्वेने एकूण १५७ लोकांवर दिवसभरात कारवाई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here