सावधान! विनामास्क आढळल्यास आता ५०० रुपये दंड! 

राज्य सरकारच्यावतीने कोविडसंदर्भात जारी केलेल्या मिशन बिगीनअंतर्गत नवे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

206

मुंबईसह राज्यात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे  सार्वजनिक ठिकाणी सध्या विना मास्कचे नागरिक आढळून आल्यास त्यांना  २०० रुपयांचा दंड आकारला जातो. आता या दंडामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी विना मास्कचे आढळून आल्यास नागरिकांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर सार्वजनिक थुंकल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून राज्य सरकारच्यावतीने कोविडसंदर्भात जारी केलेल्या मिशन बिगीनअंतर्गत हा निर्णय जाहीर करण्यात आहे. याबरोबरच रात्री आठ नंतर उद्यान व चौपाटीवर फिरताना दिसल्यासही हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

कोविडच्या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून मास्कसह सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करण्याचे निर्देश यापूर्वीच सरकारने  दिले आहे. याअंतर्गत मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना २०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. मात्र, राज्य सरकारने मुंबईसह राज्यात कोविडसंदर्भात उपाययोजनांची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये विनामास्कचे नागरिक सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास त्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश या नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मुंबईत महापालिकेच्यावतीने या सरकारच्या निर्देशानसार विना मास्कच्या नागरिकांकडून २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. परंतु या नव्या नियमावलीनुसार मुंबईतही ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच सावर्जनिक ठिकाणी थुंकल्यासही १ हजार रुपयांचा दंड आकारला जाण्याचे निर्देश प्राप्त झाल्याने या दंडाच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : राज्यभरात १५ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध! कोणते आहेत ते जाणून घ्या!)

विना मास्क कारवाईतून ४६ कोटी वसूल!

मुंबईत आतापर्यंत विना मास्कच्या सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांकडून एकूण ४६ कोटी ८७ लाख ५७ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. यातील मुंबई महापालिकेने आपल्या तसेच क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून अशाप्रकारे ४२ कोटी १६ लाख ३६ हजार  ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ४ कोटी ३५ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आणि उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या विनामास्कच्या प्रवाशांकडून आतापर्यंत ३५ लाख ४१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये मुंबई महापालिकेने क्लीन अप मार्शलच माध्यमातून २० लाख ९० हजार ३१ विनामास्कच्या नागरिकांना हटकून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. तर मुंबई पोलिसांनी २ लाख १७ हजार ८९४ आणि लोकल रेल्वेमध्ये १७ हजार ७०९ विना मास्कच्या नागरिकांना हटकून त्यांच्याकडून दंड आकारला गेला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी महापालिका, मुंबई पोलिस आणि रेल्वे लोकमध्ये एकूण १९ हजार २६२ विना मास्कच्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्यावतीन क्लीन अप मार्शलनी १३ हजार ६८९, तर पोलिसांनी ५ हजार आणि रेल्वे लोकलमध्ये ५७३ लोकांना तसेच प्रवाशांना मास्कचा वापर न केल्याने दंड आकारण्यात आला आहे.

उद्यान, चौपाटीवर रात्री ८ पर्यंतचा फिरा!

रुग्णांची संख्या वाढत असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिक उद्यान, मैदान तसेच चौपाटींवर गर्दी करून राहत असतात. त्यामुळे उद्यान व चौपाटी सारख्या सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास सरकारने  निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये उद्यान व चौपाटीवर रात्री आठ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जर या कालावधीमध्ये याठिकाणी आढळून आल्यास आपल्याला हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी आपण फिरण्यास जात असाल तर रात्री आठपूर्वीच्या घरी फिरावे लागणार नाहीतर एक हजाराची फोडणी आपल्या खिशाला लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.