विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना या योजनांचा लाभ मिळतो. पण आता UIDAI कडून एक परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यानुसार सरकारी योजनांचा आणि सबसिडींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे परिपत्रक सर्व राज्यांना जारी करण्यात आले आहे.
काय आहे नवा नियम?
आधार कार्ड नसेल किंवा आधार नोंदणी करण्यात आली नसेल तर अशी व्यक्ती इतर कोणत्याही कागदपत्रांच्या आधारे सबसिडीचा लाभ घेऊ शकणार नाही. मात्र ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही अशा व्यक्तीने आधार कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणीच्या पावतीच्या आधारे सबसिडीचा लाभ घेता येईल, अशी माहिती मिळत आहे. मात्र ज्या व्यक्तीकडे आधार कार्डसाठीची पावती देखील नाही त्या व्यक्तीला मात्र कुठलीही सबसिडी मिळणार नाही.
(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना मिळणार 7 लाखांचा लाभ, त्यासाठी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम)
गैरवापर टाळण्यासाठी निर्णय
बनावट कागदपत्रांच्या आधारे ससबसिडीचा लाभ घेणा-या नागरिकांसाठी सरकारने आधार कार्डचा नियम सक्तीचा केला आहे. यामुळे पात्र नागरिकांनाच योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल असे सांगण्यात येत आहे. या नव्या नियमामुळे सबसिडीमध्ये होणारी गळती रोखण्यास मदत होईल, असे UIDAI च्या वतीने सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community