विनाहेल्मेट दुचाकीस्वार (Bike rider without helmet) व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाचे (State Transport Department) अपर पोलिस महासंचालकांनी (ADG Police) राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विनाहेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार व सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या या सर्व मंडळींवर वाहतूक विभाग करडी नजर ठेवणार असून, त्यांची एक चूक फक्त चालकच नव्हे, तर सहप्रवाशालाही महागात पडणार आहे. (Helmet)
(हेही वाचा – चर्च आणि मशिद शाळा उघडू शकतात; पण हिंदू मंदिरांना निर्बंध; निवृत्त प्रशासकीय अधिकारी Leena Mehendale यांचा गौप्यस्फोट)
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत मुंबईत पोलिसांनी विनाहेल्मेट प्रवास केल्याप्रकरणी १७ लाख ७० हजार कारवायांमध्ये १०७ कोटी रुपये दंड आकारला आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, त्यात मृत्युमुखी, तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार (bike rider) व पाठीमागे बसलेला सहप्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community