सॅल्यूट! रेमडेसिवीरशिवाय ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात!

खासगी कोविड उपचार केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन प्रतिकूल परिस्थितीत हॉटेल रॉयलचे रुपांतर साई स्नेह कोविड सेंटरमध्ये करण्यात आले. 

96

रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने त्याच्या वापराशिवाय साई स्नेह कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्ण बरे होऊन वसंतराव पिसाळ (९१ ) आणि सुचेता केसरकर (७१ ) या ज्येष्ठ नागरिकांसह एकण ६ रुग्णांना मंगळवारी, ४ एप्रिल रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. साई स्नेह कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप येथील वॉर्डबॉय, परिचारिका यांनी टाळ्या वाजवत नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त डिस्चार्ज दिला आणि घरी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हॉटेल रॉयलचे रुपांतर साई स्नेह कोविड सेंटरमध्ये करण्यात आले!

कात्रज घाटात हॉटेल रॉयल येथे हे साई स्नेह कोविड सेंटर आहे. व्हेंटिलेटर बेड वगळता अन्य सर्व सुविधा येथे आहेत. ४० कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा येथे आहे. येथे उपचारासाठी दाखल झालेल्या आणि कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉ. सुनील जगताप म्हणाले, कोविड साथीची परिस्थिती असाधारण आहे. खासगी कोविड उपचार केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन प्रतिकूल परिस्थितीत हॉटेल रॉयलचे रुपांतर साई स्नेह कोविड सेंटरमध्ये करण्यात आले.

(हेही वाचा : मुंबईत चाळीशीच्या आतील रुग्णसंख्या दीड महिन्यातच दुप्पट!)

१५ एप्रिलला हे सेंटर सुरु झाले!

योगायोगाने येथे कार्यरत डॉ. सुमीत जगताप यांचा आज वाढदिवसही होता. त्यांनी कोविड रूग्णांवर उपचार करीत असल्याने सुटी न घेता बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन हा संस्मरणीय दिवस साजरा केला. वसंतराव पिसाळ, नितीन बांदल, निता सूर्यवंशी, रवींद्र गोळे, सुचिता केसरकर, संदीप निगडे या ६ कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना प्रोटोकॉलनुसार, आयसीएमआर गाईडलाईन नुसार उपचार करण्यात आले. १५ एप्रिलला हे सेंटर सुरु झाले. येथे ८० रुग्ण दाखल होऊ शकतात. त्यातील ४० जणांना ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देता येत आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर नातेवाईकांना एरवी नीट माहिती मिळत नाही. म्हणून नातेवाईकांना रुग्णाच्या प्रगतीची माहिती देण्याची, समुपदेशनाची खास सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिली आहे, असे डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.