Woman Doctor Assaulted : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण; कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी

733
Woman Doctor Assaulted : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण; कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी
Woman Doctor Assaulted : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण; कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी

मुंबईच्या मानखुर्द येथे पार्किंगच्या वादातून एका १६ वर्षीय तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण केली आणि कोलकातातील घटनेची पुनरावृत्ती करण्याची गंभीर धमकी दिली आहे. हा प्रकार येथील साठेनगर परिसरात घडला. (Woman Doctor Assaulted)

महिला डॉक्टरने आपल्या दवाखान्याचे शटर उघडण्यासाठी समोर पार्क केलेली स्कूटी हलवली होती. काही वेळानंतर तरुणाने डॉक्टरकडे स्कूटी कोणी हलवली याची चौकशी केली. त्यावर महिला डॉक्टरने स्कूटी हलवल्याचे सांगितले. त्यावर तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली, ज्यामुळे डॉक्टरने रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.

(हेही वाचा – Kolkata Rape Case : आर. जी. कर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड)

या घटनेनंतर तरुणाने तीन महिला नातेवाईकांसोबत येऊन डॉक्टरला मारहाण केली. यावेळी तरुणाने धमकी दिली की, “कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन.” या धमकीने महिला डॉक्टर अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी लगेचच मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. समाजात अशा घटनांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा अशा धमक्या आणि हल्ल्यांमुळे समाजातील महिलांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. (Woman Doctor Assaulted)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.