बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेत महिलांचाच वाटा ; केंद्र सरकारने भारतातील ‘Women and Men in India 2024’ अहवाल केला जारी

बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेत महिलांचाच वाटा ; केंद्र सरकारने भारतातील ‘Women and Men in India 2024’ अहवाल केला जारी

42
बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेत महिलांचाच वाटा ; केंद्र सरकारने भारतातील ‘Women and Men in India 2024’ अहवाल केला जारी
बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेत महिलांचाच वाटा ; केंद्र सरकारने भारतातील ‘Women and Men in India 2024’ अहवाल केला जारी

देशातील एकूण बँक खात्यांमध्ये महिलांची खाती ३९.२% आहे. एवढेच नव्हे तर बँक खात्यांमध्ये एकूण जमा रकमेपैकी ३९.७% रकमेतही महिलांचाच (Women and Men in India 2024) वाटा आहे. ग्रामीण भागात ४२% महिला खातेधारक आहेत. सांख्यिकी मंत्रालयाने रविवारी ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२४’ हा अहवाल जारी केला. त्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. (Women and Men in India 2024)

हेही वाचा-World Health Day : निरोगी जीवनशैलीसाठी आहार आणि झोप यांचा समतोल साधा !

शेअर बाजारातही महिलांचा सहभागही वेगाने वाढतो आहे. ३१ मार्च २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान डिमॅट अकाउंटची संख्या ३.३२ कोटींवरून १४.३ कोटींपर्यंत वाढली आहे. ही वाढ चारपटीपेक्षाही अधिक आहे. २०२१ मध्ये डिमॅट अकाउंटमध्ये महिलांची संख्या ६६.७ लाख एवढीच होती. २०२४ मध्ये ती संख्या वाढून २.७७ कोटी एवढी झाली आहे. त्यामुळे महिला आता गुंतवणूक आणि आर्थिक बाबतीतही निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये १५ वयवर्षांपेक्षा अधिक महिलांचा रोजगारातील सहभागही ६०.१% झाला आहे. तो २०१७ मध्ये ४९.८% होता. (Women and Men in India 2024)

हेही वाचा- World Health Day : तातडीच्या उपचारांसाठी अ‍ॅलोपॅथी; समूळ रोगनिर्मूलनासाठी आयुर्वेदच

पंचायत राज संस्थांमध्ये सर्वाधिक ५६ टक्के महिला उत्तराखंडमध्ये आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशात आहेत. येथील प्रमाण ५५.५ टक्के आहे. छत्तीसगडमध्ये ५५ % आहे. आसाममध्ये ५४.७ % आहे. केरळ- ५४.५, महाराष्ट्र- ५४.३% यांचा क्रमांक लागतो. पंचायतींमध्ये सर्वात कमी महिला लडाख-३१.८ %, दादरा-नगर हवेली-३२ %, जम्मू- काश्मीर-३३.२%, उत्तर प्रदेशात ३३.३ टक्के आहे. (Women and Men in India 2024)

हेही वाचा- Conversion : उपचाराच्या नावाने डॉ. खालिद खान करायचा हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर; हिंदू मुलगी अडकली जाळ्यात

आर्थिक वर्ष २०२० मध्ये वरिष्ठ पदांवर महिलांची भागीदारी १४.७ टक्के होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये वाढून ती १६.६ टक्क्यांवर गेली. याच काळात पुरुषांची भागीदारी ८५.३ टक्क्यांहून घटून ८३.३ टक्क्यांवर आली आहे. नोकर भरतीमधील जेंडर गॅप अजूनही कायम दिसून येतो. एका महिलेची भरती झालेल्या ठिकाणी सरासरी दोन पुरुषांची नियुक्ती केली जात असल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे. हळूहळू हे महिलांचे प्रमाण वाढायला हवे. (Women and Men in India 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.