धक्कादायक! खंडणीसाठी महिला बनली नक्षलवादी!

महिलेने एमबीबीएस डॉक्टरला 'लाल सलाम' या नक्षलवाद्यांच्या नावाने पत्र लिहून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.

83

सध्या घडत असलेल्या गुन्ह्याचे प्रकार पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा गुन्हा घडला आहे. एका महिलेने खंडणी मागण्यासाठी स्वतःची नक्षलवादी ओळख सांगून नक्षलवाद्यांच्या नावाने तिने खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

…तर मुलाची हत्या करू!

या महिलेने एमबीबीएस डॉक्टरला ‘लाल सलाम’ या नक्षलवाद्यांच्या नावाने पत्र लिहून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष १२ ने त्या महिलेला अटक केली आहे. या महिलेने लाल सलाम नावाने पत्र पाठवले होते, त्यात खंडणीची रक्कम टाकून खंडणी न दिल्यास ‘ऑपरेशन स्टार्ट’ अंतर्गत मुलाची हत्या आणि ऑपरेटिंग संपन्न अंतर्गत डॉक्टरची हत्या करण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे दिली होती.

New Project 5 2

 

(हेही वाचा : अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर! कुठे टाकल्या धाडी?)

युट्युब बघून महिलेला सुचली कल्पना!

या महिलेला तिच्या एका सहकार्यासह अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यूट्यूब बघून डॉक्टरला लुटण्याचा प्लान करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.