Women Empowerment : केवळ 6 ते 10 टक्के महिलाच अग्रगण्य कृषी कंपन्यांमध्ये कार्यरत

53
Women Empowerment : केवळ 6 ते 10 टक्के महिलाच अग्रगण्य कृषी कंपन्यांमध्ये कार्यरत

एक वैविध्यपूर्ण संशोधन आणि विकासावर केंद्रित असलेला अन्न व कृषी व्यवसाय समूह गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड (Godrej Agrovet) ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA) आणि गोदरेज DEI लॅब यांच्या सहकार्याने “वूमेन इन अॅग्रीबिझनेस – ऑपॉरच्युनीटीज अँड चॅलेंजेस” (कृषी व्यवसायातील महिला – संधी आणि आव्हाने) हा अहवाल त्यांच्या दुसऱ्या वूमेन इन अॅग्रीकल्चर समीट (महिला कृषी परिषद) मध्ये प्रकाशित केला.

या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की भारताच्या कृषी कार्यशक्तीमध्ये महिलांचा वाटा 64.4 टक्के आहे, मात्र केवळ 6 टक्के ते 10 टक्के महिला अग्रगण्य कृषी आणि कृषी-संबंधित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या अहवालात कृषी व्यवसायात समावेश, नाविन्यपूर्णता आणि समान विकासासाठी कृतीयोग्य उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. (Women Empowerment)

(हेही वाचा – Twitter च्या ब्लू बर्डला नवीन मालक मिळाला, करार कितीला झाला?)

या अहवालावर भाष्य करताना गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, “गोदरेज अॅग्रोवेटमध्ये आमचा असा विश्वास आहे की कृषी व्यवसायाचे भवितव्य हे महिलांना शिक्षण, कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशकता आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यात आहे. कौशल्य आणि उद्योगाच्या गरजांशी जोडून घेत प्रोत्साहनपर मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून आम्ही अर्थपूर्ण बदल घडवण्याचे आणि एक सक्षम, न्याय्य क्षेत्र उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी, आम्ही कृषी मूल्य साखळीत 1,00,000 महिलांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले होते आणि मला अभिमान आहे की केवळ एका वर्षात आम्ही 20,000 महिलांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. प्रशिक्षण, सुरक्षित जागा निर्माण करणे आणि नेतृत्वाला प्रोत्साहन यातून आम्ही एक सक्षम कृषी व्यवसाय समुदाय उभारण्याच्या दिशेने काम करत आहोत.” (Women Empowerment)

(हेही वाचा – Veer Savarkar : कैवल्य विद्या निकेतन शाळेतील शिक्षक सावरकर स्मारकातील लाईट अँड साउंड शो पाहून झाले प्रभावित)

IIMAच्या प्राध्यापिका विद्या वेमिरेड्डी यांनी सांगितले, “भारतातील कृषी क्षेत्रात एक मोठा विरोधाभास दिसून येतो: महिलांचा कृषी विषयक कामात आणि शैक्षणिक गटांमध्ये मोठा सहभाग असला तरी पदवीधर महिलांपैकी बहुसंख्य महिला औपचारिक रोजगाराच्या रचनेत आणि नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये प्रवेश करत नाहीत. या अभ्यासात कृषी व्यवसाय उद्योगांमध्ये महिलांच्या औपचारिक रोजगार सहभागासंबंधीच्या महत्त्वाच्या ज्ञानाच्या उणिवांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.”

हा अहवाल कृषी क्षेत्रातील लिंगभेद दूर करण्यासाठी एक रोडमॅप प्रदान करतो. संसाधनांमध्ये समान प्रवेश, स्त्री-पुरुष यांच्या अनुरूप प्रशिक्षण आणि सर्वसमावेशक अशी कामाच्या ठिकाणातील सुधारणा यांसाठी यात आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण ते रोजगार बदलाला प्राधान्य देणे, नेतृत्व प्रतिनिधित्व वाढवणे आणि आर्थिक तसेच तांत्रिक साधनांचा उपयोग करणे या गोष्टी परिवर्तनात्मक धोरणे म्हणून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. एकत्रितपणे, या उपाययोजना महिलांना सक्षम बनवण्याच्या आणि कृषी मूल्य साखळीत समान विकासाला चालना देण्याच्या दिशेने वाटचाल करतील. (Women Empowerment)

(हेही वाचा – सीबीआयकडून अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूचा तपास बंद; न्यायालयात सादर केला क्लोजर रिपोर्ट)

या समिटमध्ये गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन निसाबा गोदरेज आणि गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव यांनी ‘गोदरेज अॅग्रोवेट वूमेन इन अॅग्रीकल्चर स्कॉलरशीप’ सादर करण्याची घोषणा केली. ही शिष्यवृत्ती कृषी अभ्यास करणाऱ्या पाच विद्यार्थिनींना सक्षम बनवून पुढील पिढीत महिला नेतृत्व विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे.

गोदरेज अॅग्रोवेटच्या ह्युमन रिसोर्सेस विभागाच्या प्रमुख मल्लिका मुत्रेजा म्हणाल्या, “कृषी शिक्षणात 30 टक्के ते 40 टक्के महिला विद्यार्थिनींची नोंदणी होते, मात्र केवळ 6 टक्के ते 10 टक्के महिला अग्रगण्य कृषी आणि कृषी-संबंधित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या मोठ्या तफावतीवरून हे स्पष्ट होते की उद्योगाने ही दरी भरून काढण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे. समावेशक धोरणांना प्रोत्साहन देऊन आणि संधी निर्माण करून, या असमतोलावर मात करता येईल तसेच महिलांच्या नाविन्यपूर्ण आणि खंबीर योगदानामुळे कृषी क्षेत्राच्या शाश्वत वाढीला चालना मिळेल.” (Women Empowerment)

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर १९१ माध्यमिक शाळेच्या शिक्षणाचा भार)

“गोदरेज अॅग्रोवेटमध्ये आम्ही आर्थिक वर्ष 25 मध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 8 टक्क्यांवरून 12 टक्केपर्यंत वाढवले आहे आणि आर्थिक वर्ष 28 पर्यंत ते 32 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य आहे. बालसंगोपन केंद्र आणि विशेष काळजी धोरणांसारख्या उपक्रमांद्वारे तसेच अग्रणी भूमिकांमध्ये महिलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करून आम्ही महिलांना प्रगती करण्यासाठी सर्वसमावेशक आणि पाठबळ देणारे कार्यस्थळ निर्माण करत आहोत,” असेही त्या पुढे म्हणाल्या.

अन्न मूल्य साखळीमध्ये — शेतापासून ग्राहकांपर्यंत — महिलांना सक्षम करण्याच्या आपल्या बांधिलकीला अधोरेखित करण्यासाठी गोदरेज अॅग्रोवेटने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी गोदरेज फुड्स लिमिटेड (GFL) च्या प्रभावी उपक्रमांची माहिती दिली. कर्नाटकमधील भाग्यम्मा आणि नाशिकमधील जयश्री यांसारख्या शेतकऱ्यांना पाठबळ देत आणि मणिपूरमधील रोझालिन यांसारख्या वितरणात अग्रणी असणाऱ्यांना सक्षम करत, GFL सर्वसमावेशकता आणि मजबूती वाढवण्याचे कार्य करत आहे. ‘WINGS’ यांसारख्या कार्यक्रमांद्वारे, GFL अधिकाधिक महिलांना विक्री, विपणन आणि नेतृत्व भूमिकांमध्ये आणत आहे, नाविन्यपूर्णतेला चालना देत आहे आणि त्यायोगे महिलांच्या नेतृत्वाखालील एक समतोल आणि शाश्वत अन्न पुरवठा साखळी घडवत आहे. (Women Empowerment)

(हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्यावरील Export Duty बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय)

या समिटमध्ये दोन चर्चासत्रे देखील आयोजित करण्यात आली. “ब्रेकिंग बॅरियर्स फॉर वूमेन इन अॅग्रीकल्चर” या चर्चासत्राचे संयोजन गोदरेज अॅग्रोवेटच्या ह्युमन रिसोर्सेस प्रमुख मल्लिका मुत्रेजा यांनी केले. यामध्ये पॅनेलिस्ट म्हणून Animall च्या सह-संस्थापक कीर्ती जांग्रा, महिंद्रा ग्रुपच्या चीफ कस्टमर आणि ब्रँड ऑफिसर आशा खरगा, BASF च्या HR APAC आणि ग्लोबल HRBP प्रमुख अनिता पोलिमेटला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA)च्या प्राध्यापिका विद्या वेमिरेड्डी यांचा सहभाग होता.

“बोर्डरूम टू ब्रेकथ्रू : वूमेन इन लीडरशीप” या चर्चासत्राचे संयोजन गोदरेज DEI लॅबचे प्रमुख परमेश शहानी यांनी केले. यात VIP Industries च्या व्यवस्थापकीय संचालक नितू काशिरामका, अंकुर कॅपिटलच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार रितू वर्मा आणि वॉटरफील्ड अॅडव्हायजर्सच्या व्यवस्थापकीय संचालक सौम्या राजन यांनी सहभाग घेतला. वूमेन इन अॅग्रीकल्चर समीट हा सुव्यवस्थित बदलांसाठी एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. आपल्या उपक्रमांद्वारे आणि माहितीद्वारे गोदरेज अॅग्रोवेट महिलांच्या योगदानाची माहिती देण्यास, त्याचा गौरव करण्यास आणि त्याचा प्रचार करण्यात आघाडी घेत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात अधिक समावेशक आणि न्याय्य भविष्य घडवण्याचा मार्ग मोकळा होत आहे. (Women Empowerment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.