महिला सशक्तीकरणाला नवा आयाम; विधान परिषदेत International Women’s Day निमित्त विशेष प्रस्ताव मांडला

65

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जनकल्याणकारी योजना राबवून समाजातील दुर्बल घटकांना मदत केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या सर्वांगीण विकासावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) पूर्वसंध्येला केले.

(हेही वाचा – Pune Police Suspended : पुण्यात चार पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; वाढदिवसाचे ‘पुष्पा’स्टाईल सेलिब्रेशन भोवले )

अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या प्रेरणादायी कार्याचा संदर्भ देत महिलांच्या सबलीकरणावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला सशक्तिकरणावर विधान परिषदेत सादर करण्यात आलेल्या विशेष प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला, तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.

महिला सबलीकरणासाठी शासनाच्या विविध योजना

सभागृहात बोलताना राम शिंदे (Ram Shinde) यांनी अहिल्यादेवींनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख करत, महिलांनी कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सशक्तिकरणाच्या दिशेने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांनी सैन्यात महिलांची तुकडी तयार केली, शेतकऱ्यांना करमाफी दिली, सिंचनासाठी तलाव आणि विहिरी बांधल्या, दुर्लभ ग्रंथांचे हस्तलिखित जतन केले, विद्यासागर आणि ज्ञानदानाचा पुरस्कार केला, सतीप्रथेचा विरोध करत महिलांना संपत्तीतील हक्क मिळवून दिला, पर्यावरण रक्षणासाठी नदी प्रदूषण रोखण्याचे धोरण आखले आणि वनसंवर्धनासाठी कार्य केले. अहिल्यादेवींच्या न्यायदान प्रणालीचा अनेक राज्यांनी गौरव केला असून, त्यांच्या राज्यात रयतेच्या कल्याणावर भर देण्यात आला होता.

महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी धोरणांची गरज – नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच न्यायहक्कांसाठी अधिक प्रभावी धोरणे राबवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

 महिला सशक्तिकरणासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज

विधान परिषदेत मांडलेल्या या विशेष प्रस्तावामुळे महिला सशक्तिकरणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सर्वच पक्षांच्या सदस्यांनी महिलांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महिला सबलीकरणासंबंधी सरकार विविध योजना राबवत असले तरी महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत बहुसंख्य सदस्यांनी मांडले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.