समानतेच्या भूमिकेतून महिलांना मिळाले अधिकार – डॉ. नीलम गोऱ्हे

155

महिलांबाबतच समाजातील दुजाभाव कमी होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत, याच समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार मिळाले आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या विषमतेचे समर्थन करत असतील तेथे त्याविरोधात आपण जाणिवपूर्वक काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

प्रशिक्षण शिबिराचा आयोजन

स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला स्वयंसेवक आयकार्ड वाटप कार्यक्रमात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील दक्षता समितीच्या महिलांचे गणेशोत्सव व नवरात्र उत्सव काळात घ्यावयाची काळजी, तसेच उपाययोजना बाबत प्रशिक्षण शिबिराचा आयोजन स्त्री आधार केंद्राच्या वतीने मागील आठवड्यात घेण्यात आले होते. यादरम्यान प्रशिक्षणावर आधारित कार्यक्रमातील माहितीच्या आधारे परीक्षा घेऊन उत्तीर्ण स्वयंसेवक महिलांना डॉ. गोऱ्हे, स्त्री आधार केंद्रच्या विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक यांच्या हस्ते देण्यात आले.

(हेही वाचा यंदा एसटीने दीड लाख गणेशभक्त कोकणात जाणार)

अत्याचार होऊ नये म्हणून काम करावे 

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अत्याचार होऊ नये म्हणून आपण काम करणे आवश्यक आहे. ना की फक्त अत्याचार झाल्यास संस्थेसोबत काम करणे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी विश्वस्त जेहलम जोशी यांनी महिलांना वाटप करण्यात आलेल्या आयकार्डचा दुरूपयोग होणार नाही. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी सचिव अपर्णा पाठक म्हणाल्या की, मागील वर्षी स्त्री आधार केंद्राच्या मार्फत महिला स्वयंसेवक यांनी केलेली कामगिरी सांगितली. दर महिन्याच्या 25 तारखेला महिलांच्यावर होणारे अत्याचार विरोधी कार्यक्रम संस्थेत राबविला जातो. याबाबत उपस्थित महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते रमेश शेलार यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. यासाठी आश्लेष खंडागळे आणि विभावरी कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.