विदर्भात महिला बनल्या असुरक्षित, तब्बल ८१२ महिला बेपत्ता!

सध्या महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यात विदर्भातील महिला बेबेपत्ता होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील ८१ दिवसांत विदर्भातून तब्बल ८१२ महिला बेपत्ता झाल्या आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. मुली व महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण का वाढले? हे एक कोड निर्माण झाले आहे.

बेपत्ता होण्यामागील नक्की कारण काय? 

बेपत्ता झालेल्या मुलींचे काय झाले असेल याबाबत अडीच वर्षापूर्वी अधिवेशनामध्ये प्रश्न् सुध्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना बेपत्ता महिला व मुलींचे अहवाल सादर करण्याचे आदेश देवून त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिला व पुरुष पोलीस अधिकार्‍यांच्या नियुत्यासुध्दा करण्यात आल्या आहेत. पुढे त्या मुलींचे काय झाले? त्या सध्या कुठे आहेत? त्या सुरक्षित आहे की, त्यांना दलालांनी वेश्या व्यवसायाकडे वळविले की याप्रकारामागे लव्ह जिहाद आहे, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

खरी माहिती बाहेर येणे गरजेचे!

बेपत्ता झालेल्यांपैकी काही तरुणी व महिला घरी परतल्या असतील, काही पळून गेल्याने मुली लग्न करुन परतल्या असतील किंवा आई-वडिलांच्या संमतीने त्यांचे पळून गेलेल्या मुलासोबत लग्न लावून दिले असेल, परंतु ज्या मुली व महिला घरी परतल्याच नाही किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही, त्या सध्या कुठे व कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत. याची खरी माहिती बाहेर येणे गरजेचे आहे. विदर्भातील जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक १९४ महिला बेपत्ता झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here