भारतातील महिलांचे नोकरीत काम करण्याचे प्रमाण कमी आहे. मुलींच्या लग्नाचे वय जर 18 वरुन 21 केले तर मुलींना उच्च शिक्षण घेऊन करिअरकडे लक्ष देता येईल, असं एसबीआय रिसर्चमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच नमुना नोंदणी यंत्रणेद्वारे जारी केलेल्या सर्वेक्षणात भारतातील विवाहाचे सरासरी वय 2019 मध्ये घसरून 22.1 वर्षांवर आले आहे.
भारतातील महिलांचा सहभाग कमी
भारतातील 5 महिलांमधील दुस-या महिलेचे लग्न 21 वर्षांपेक्षा कमी वयात होते. पश्चिम बंगालमध्ये तर जवळपास अर्ध्या महिलांचे लग्न 21 वर्षांच्या आधी होते. कामकरी महिलांच्या बाबतीत भारताची स्थिती जगात खूपच खालावलेली आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार, महिलांचा देशाच्या श्रमशक्तीतील सहभागाचा दर 20 टक्केच आहे.
सरकारचा नवा कायदा
टाळेबंदीमुळे महिलांच्या श्रम सहभागावर अधिक परिणाम झाला. 2019-2020 मध्ये श्रमशक्तीतील महिलांचा सहभाग 10.7 टक्के होता. मात्र, एप्रिल 2020 मधील टाळेबंदीमुळे 13.9 टक्के महिलांना रोजगार गमवावा लागला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने संसदेत एक विधेयक सादर करुन,महिलांचे लग्नाचे वय 18 वर्षांवरुन 21 वर्षे करण्यात आले आहे.
( हेही वाचा :तुम्ही तिकीट काढताय ना? मध्य रेल्वेने राबवलीय ‘ही’ मोहिम! )
कमी वयात लग्न करणारी राज्ये
- पश्चिम बंगाल-50 टक्के
- बिहार-40 टक्के
- मध्य प्रदेश-43 टक्के
- छत्तीसगढ-38 टक्के
- राजस्थान-40 टक्के
- आंध्र प्रदेश-35 टक्के