‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) मंजूरी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. (Women Reservation Bill 2023 )
२० सप्टेंबरला लोकसभेत तर,२१ सप्टेंबरला राज्यसभेने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. महिला आरक्षणावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब झाले आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा बनला आहे. या विधयेकायमुळे लोकसभा, विधानसभेत महिलांना ३३% जागा मिळणार आहेत. मात्र महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असले तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी काही महत्वाचे टप्पे पार करावे लागणार आहेत. यात सर्व राज्य सरकार यांच्यासह जनतेचाही अप्रत्यक्षपणे सहभाग असणार आहे. (Women Reservation Bill 2023 )
(हेही वाचा : Ganeshotsav 2023 Immersion : मुंबईत यंदा किती वाढले घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती, काय सांगते आकडेवारी जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community