राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सन्मान निधी पाठवला जात आहे. हा निधी काढण्यासाठी महिला बँकांत गर्दी करत आहेत. (Ladki Bahin Yojana)
(हेही वाचा – “पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण…” Sanjay Raut यांची अजित पवारांवर खोचक टीका)
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत साधारण 96 लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये पाठवले आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिला बँकेत तुफान गर्दी करत आहेत. भिवंडीतील बँकांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
बँकांबाहेर लागल्या रांगा
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे. भिवंडी शहरातील अनेक बँकांमध्ये ही गर्दी झाली आहे. योजनेचे पैसे खात्यावर खरंच आले आहेत का? हे तपासण्यासाठी आणि जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी ही गर्दी केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अनेक महिलांच्या बँक खात्याची केवायसी झालेली नाही. त्यामुळेदेखील महिला ही गर्दी करत आहेत. सरळगाव (जिल्हा ठाणे) येथील बँक ऑफ बडोदामध्येही लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी उसळली होती.
अशाच प्रकारची गर्दी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पहायाला मिळत आहे. महिलांनी बँकेमध्ये तसेच बँकेच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community