महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळावीत; आमदार Chitra Wagh यांची विधान परिषदेत मागणी

35
महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळावीत; आमदार Chitra Wagh यांची विधान परिषदेत मागणी
  • प्रतिनिधी

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा मिळावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांनी विधान परिषदेत केली. महिलांना स्वच्छतागृहांच्या अभावामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या भोगाव्या लागतात. त्यामुळेच प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहात QR कोड तक्रार प्रणाली राबवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे सुचवत त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.

(हेही वाचा – एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर descriptive स्वरूपात होणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा)

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी स्पष्ट केले की, महिलांना शौचालयांची गरज असते तेव्हा ती बांधली जातात मात्र स्वच्छता आणि देखभाल होत नाही. त्यामुळे QR कोड स्कॅन करून तक्रार करण्याची सुविधा असावी, ती स्थानिक संस्थेशी जोडावी, आणि तक्रारींवर तात्काळ कारवाई करणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी केली.

(हेही वाचा – पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू!; नागपूर दंगल प्रकरणात CM Devendra Fadnavis यांचा इशारा)

राज्यातील हॉटेल्स, मॉल्स आणि पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहांची पाहणी करून अस्वच्छ ठिकाणांची परवानगी रद्द करावी, अशीही त्यांनी सूचना केली. मुंबईत १८२० महिलांमागे एक शौचालय आहे, ती संख्या वाढवावी, तसेच वस्तीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी वीज आणि पाण्याचे दर कमी करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मागणीला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. (Chitra Wagh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.