रत्नागिरी जिल्हा शांत व संयमी आहे. येथे महिलांचे सर्वांत जास्त प्रमाण आहे. या सर्व महिला काबाडकष्ट करणाऱ्या आहेत. महिला गृहिणी असली, तरीही त्या हजारो रुपये वाचवत असतात. स्वयंपाक, मुले सांभाळणे, भांडी घासणे अशा सर्व कामांसाठी महिला ठेवल्यास त्यांना वेतन द्यावे लागते. त्यामुळे गृहिणी तेवढे पैसे कमवत आहेत. आई ही सर्वांत जास्त नियोजन, व्यवस्थापन करत असते. महिलांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. प्रत्येक महिलेकडे काही ना काही कौशल्य असतेच, ते विकसित करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.
महिलादिनानिमीत्त प्रदर्शन
महिला दिनानिमित्त रत्नागिरी जे. के. फाइल्स येथील साई मंगल कार्यालयात ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रदर्शनात सुमारे ६० स्टॉल्स मांडले आहेत. यात कोकण मेवा, खाद्यपदार्थ, महिलांकरिता सौंदर्यप्रसाधने, साड्या, ड्रेस मटेरियल, ज्वेरली, हॅंडीक्राफ्ट प्रॉडक्टस, दर्जेदार मसाले यासह पाणीपुरी, भेळ, टेस्टी कोन, स्नॅक्सच्या स्टॉल्सचा समावेश आहे.
( हेही वाचा :“…नाही तर सरकारला भाग पाडू”, फडणविसांचा इशारा )
विविध स्पर्धांचे आयोजन
प्रदर्शन ८ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचा कालावधी स्टॉल्सधारक महिलांसाठी पाककृती स्पर्धा, महिलांची मोफत नेत्र तपासणी, आरोग्यविषयक व्याख्याने, पोलीस विभागातर्फे महिला संरक्षणाविषयी मार्गदर्शन, केक बनवण्याचे प्रशिक्षण, फनी गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे बक्षीस वितरण आदींचे आयोजन केल्याची माहिती प्राची शिंदे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community