Women’s Day 2023 : महिलांना १ रुपयात मिळणार सॅनिटरी पॅड्स! काय आहे केंद्र सरकारची योजना?

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेनुसार (PMBJP) सर्वांना परवडणाऱ्या दरात औषधं उपलब्ध करून दिली जातात. जेनेरिक औषधांसाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत.

( हेही वाचा : धक्कादायक! दिल्लीत मुसलमान तरूणाने हिंदू मुलीवर झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक )

महिला सॅनिटरी पॅड्स फक्त १ रुपयात

महिलांच्या आरोग्य सुरक्षेची दखल घेऊन, भारत सरकारने सॅनिटरी पॅड्स या सर्व जन औषधी केंद्रांमध्ये माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहेत. जन औषधी केंद्रांवर सॅनिटरी पॅड्स फक्त १ रुपया प्रति पॅड या दरामध्ये उपलब्ध आहेत. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.

“जन औषधी सुगम” नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन आता Google Play Store आणि Apple Store वर उपलब्ध आहे. त्याशिवाय या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता तुम्हाला आवश्यक असलेल्या औषधांची माहिती कधीही – कुठेही मिळू शकणार आहे. औषधाची किंमत, उपलब्धता आणि तुमच्या जवळच्या जन औषधी केंद्राची माहिती इत्यादीबाबत या ॲपद्वारे माहिती मिळेल.

आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७४३ जिल्ह्यांमध्ये ही केंद्र कार्यरत आहेत. यावर्षी दिनांक डिसेंबर २०२३ पर्यंत या केंद्रांची संख्या १० हजारपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जनऔषधी जेनेरिक औषधांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा ५० ते ९० टक्के कमी आहेत. त्यामुळे, ही योजना दररोज औषधे घेत असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याची ठरत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here