International Women’s Day निमित्त मुंबईत महिला तक्रार निवारण दिनाचे आयोजन

61
International Women's Day निमित्त मुंबईत महिला तक्रार निवारण दिनाचे आयोजन
  • प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) मुंबई पोलिसांनी शनिवारी महिलासाठी विशेष तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी जवळपास दीड हजार महिलांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करण्यात आले आहे. तसेच महिला दिनानिमित्त विविध परिमंडळ अंतर्गत ‘जागरूकता कार्यक्रम’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संपूर्ण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात ६४६३ महिला उपस्थित होत्या.

मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येक दिवशी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जाचे निवारण करण्यासाठी मुंबई पोलीस दलाकडून प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर हे आयोजन करण्यात येते. या तक्रार निवारण दिनाच्या दिवशी तक्रारदाराने केलेल्या तक्रार अर्जाचे निवारण करून दखलपात्र अदखलपात्र गुन्हे दाखल करून तक्रार अर्जाचा निपटारा केला जातो. (International Women’s Day)

(हेही वाचा – महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; खासदार Dr. Shrikant Shinde यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश)

या आठवड्यात शनिवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) महिला तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील १३ परिमंडळातील (झोन) प्रत्येक पोलीस ठाण्यात शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष महिला तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला होता. त्याचसोबत महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यामध्ये राबविण्यात आलेल्या जागतिक महिला तक्रार निवारण दिनी १४७१ महिलांच्या तक्रार अर्जाचे निवारण करण्यात आले. काही तक्रार अर्जांमध्ये दखलपात्र तर काही अर्जांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर इतर अर्जावर पोलीस ठाणे स्तरावर निवारण करण्यात आले आहे. या प्रसंगी विविध पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन निमित्ताने (International Women’s Day) कर्तबगार महिलांचा उपस्थित पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाव्दारे प्रत्येक पोलीस ठाण्यात उपस्थित महिलांना सुरक्षेबाबतचे धडे देण्यात आले. तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन शिबीर, रक्तदान तपासणी शिबीर, अत्याचार व संरक्षण बाबत मार्गदर्शन, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या माहिला अधिकारी आणि महिला अंमलदारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.