हिंदू म्हणून काम करत रहावे; ज्येष्ठ अभिनेते Rahul Solapurkar यांचे आवाहन

45
हिंदू म्हणून काम करत रहावे; ज्येष्ठ अभिनेते Rahul Solapurkar यांचे आवाहन
हिंदू म्हणून काम करत रहावे; ज्येष्ठ अभिनेते Rahul Solapurkar यांचे आवाहन

सुसंस्कृत, सुसंस्कारित समाज आणि राष्ट्रहितासाठी सर्वांना उभे करणे हे आपले कर्तव्य आहे. ब्राह्मण ही माझ्यासाठी जात नसून एक आदर्श वृत्ती, संस्कृती आहे. आपण हिंदू म्हणून काम करत रहावे, असे आव्हान जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी केले. ते पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित ब्राह्मण सामर्थ्य संमेलनात “ब्राह्मण समाजाचे सामर्थ्य” या विषयावर बोलत होते. या प्रसंगी भावेनजी पाठक, कुणाल टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी विशेष वक्ते सात्यकी सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : सख्ख्या भावांची तिसरी जोडी निवडणूक रिंगणात!)

जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, कृत, कारिता आणि अनुदित या महत्त्वाच्या तत्त्वांवर ब्राह्मण समाज काम करत आहे. समाजातील सर्व क्षेत्रांत ब्राह्मण समाज कार्यरत आहे. दुर्दैवाने गांधी हत्येनंतर जे काही अत्याचार सहन करावे लागले, त्यामुळे ब्राह्मण समाज अत्यंत कोशात गेला. मूळ कर्तव्य विसरला. आजची पिढी तर आपण शिकूया व परदेशात जाऊया या मानसिकतेत असल्याचे दिसून येते.

संमेलनात सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी ‘हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. सात्यकी सावरकर म्हणाले, गेल्या काही वर्षातील किंवा शतकातील हिंदूविरोधी घटना बघता आता हिंदूंनी जातीभेद मोडून एकत्र येणे आवश्यक आहे. ‘बटोगे तो कटोगे’ हे योगी आदित्यनाथ यांचे विधान लक्षात घ्यावे. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे बंधुत्व आहे. समान रक्त, समान इतिहास आणि समान संस्कृती यांनी युक्त असे भावकीचे नाते आहे. सावरकरांनी जसे हिंदूंचे प्रबोधन केले, तसे मुस्लिमांचे देखील केले. त्यामुळे सावरकर हे मुस्लिम विरोधी नव्हते.” असे सांगून सावरकर यांनी येत्या निवडणुकीत सर्वांनी शत प्रतिशत मतदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

या प्रसंगी समाजासाठी विशेष योगदान देणारे कुंदन कुमारसाठे, संस्थापक-अध्यक्ष थोरले बाजीराव पेशवे संस्था; मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक; सुरेश साखळकर, संस्थापक-अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ; संदीप डोळे, मनोहर डोळे, फाउंडेशन अ‍ॅड. सन्मान आयाचित; अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर, किरणजी जोशी, उज्ज्वला गौड, वेदमूर्ती केशव दिवाकर दिगवेकर यांना सन्मानित करण्यात आले. महेश दादा लांडगे यांच्या वतीने कार्तिक लांडगे यांनी ‘ब्रह्म मित्र विशेष पुरस्कार’ या प्रसंगी स्वीकारला.

दिवाळी अंकाचे प्रकाशन

“न्यूज डंका” या मीडिया पार्टनरकडून प्रकाशित “351 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त दिवाळी अंक” ‘शिवरायांचे आठवावे प्रताप’ या दिवाळी अंकाचे पुनश्च प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र चिपळूणकर, तर आभार डॉ. सचिन बोधनी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, बहुभाषिक ब्राह्मण संघ, ब्राह्मण सभा, राजगुरुनगर, महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा लोणावळा, अखिल ब्राह्मण संघ पुणे, विप्र फाउंडेशन पुणे, गोवर्धन ब्राह्मण संघ, पुणे, परशुराम सेवा संघ, पुणे, ब्राह्मण जागृती सेवा संघ, परशुराम सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, उत्तर भारतीय ब्राह्मण सभा, पनवेल, पेण व खोपोली, चित्पावन ब्राह्मण संस्था, शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण सभा पुणे, बोंड संस्था, युवोन्मेष परिवार पुणे, गौड ब्राह्मण संघटन, पुणे,. ब्राह्मण महासंघ, पुणे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र व आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण सभा, खोपोली, जुन्नर केंद्र आदी संस्थांचे सहकार्य लाभले. (Rahul Solapurkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.