Metro 3 च्या १० स्थानकांचे काम पूर्ण; कधी करता येणार भुयारी प्रवास ?

२८ मीटर अर्थात ९० फूट जमिनीखालून जाणाऱ्या कुलाबा ते सिप्झ Metro 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानच्या दहा स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे.

138
Metro 3 च्या १० स्थानकांचे काम पूर्ण; कधी करता येणार भुयारी प्रवास ?
Metro 3 च्या १० स्थानकांचे काम पूर्ण; कधी करता येणार भुयारी प्रवास ?

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून हा ३३.५ किमी लांबीचा भुयारी मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यावर एकूण २७ स्थानके असून पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरेदरम्यानची १० स्थानके बांधून पूर्ण झाली आहेत. (Metro 3 )

२८ मीटर अर्थात ९० फूट जमिनीखालून जाणाऱ्या कुलाबा ते सिप्झ मेट्रो ३ या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानच्या दहा स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. या बहुप्रतिक्षित भुयारी मार्गावरील वाहतूक सप्टेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Haryana Assembly Elections : हरियाणात थर्ड फॅक्टर बिघडवणार समीकरणे ?)

दुसऱ्या टप्प्याच्या कामांना गती

एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी करून घेतली असून आता कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी मार्फत तपासणी केली जाणार आहे. सीएमआरएस कडून प्रमाणपत्र प्राप्त होताच पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. दरम्यान, या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांनाही गती देण्यात आली असून संपूर्ण ३३ किमीचा भुयारी मार्ग पुढील वर्षी वाहतुकीसाठी खुला होण्याचा अंदाज आहे.

आरे, सिप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २, सहार रोड, विमानतळ टर्मिनल १, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी या स्थानकांवर ही मेट्रो थांबणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील स्थानके २२ ते २८ मीटर जमिनीखाली असून मुंबई विमानतळाजवळ असलेली सहार रोड टर्मिनल १ आणि टर्मिनल २ ही स्थानके सर्वांत जास्त खोलीवर आहेत. (Metro 3)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.