बीकेसी येथे मेट्रो लाइन ३चं (Metro Line 3 Junction) जंक्शन असणार आहे. मुंबईची भूमिगत मेट्रो म्हणजे मेट्रो लाइनचं ३चं काम वेगात सुरू आहे. याच ठिकाणी मेट्रोचं काम सुरू असताना साप आढळून आल्यानं कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मुंबई मेट्रो बांधकामस्थळी जमिनीवर असलेल्या बिळात पावसाचे पाणी जाऊन एकाच वेळी अनेक साप बिळाबाहेर पडले. यामुळे बांधकामस्थळी काम करणाऱ्या मजुरांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.
सर्प मित्रांनी मागील दोन दिवसांत एकूण १० सापांना मुक्त करून त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. यात ८ विषारी घोणस आणि २ बिन विषारी नानेटी सापांचा समावेश होता.
(हेही वाचा – Vidhan Parishad Election 2024 : मनसे महायुतीसोबत नाही? विधान परिषदेबाबत संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट!)
घोणस जातीची मादी एका वेळेस ६० ते ७० पिल्लांना जन्म देते. यामुळे बांधकामस्थळी एकच खळबळ उडाली आहे. परिसरात आणखीही काही साप असल्याचं मजुरांचं म्हणणं आहे. बीकेसी येथील मुंबई मेट्रो लाइन २ ब कास्टींग यार्डशेजारी असलेल्या प्रोजेक्ट ऑफिस परिसरातच विषारी सापाच्या मादीने पिल्ले घातली आहेत. १९ जून रोजी पहिल्यांदा घोणस जातीच्या सापाचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर २२ जून रोजी पुन्हा एक पिल्लू आढळून आल्याने प्रोजेक्ट साइटवरील सुरक्षारक्षकाने याची माहिती सर्पमित्रांना दिली.
नैसर्गिक अधिवासात सोडले…
सर्पमित्रांनी पाहणी करून या परिसरातून ४ सापांना मुक्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ घोणस जातीचा आणि २ नानेटी बिनविषारी साप मुक्त करत एकूण १० सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community