अयोध्येतील राम मंदिराचा सिंह दरवाजा (Ayodhya Ram Temple) तयार झाला आहे. मंदिर ट्रस्टने रविवार, २४ सप्टेंबरला त्याचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले होते. या दरवाजाचे बरेच काम अद्याप बाकी आहे.
जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या रामललांच्या अभिषेकापूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मनुष्यबळही वाढवण्यात आले आहे. राजस्थानच्या सिंक पिंक स्टोनपासून राममंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंह दरवाजा तयार करण्यात आला आहे. या भव्य प्रवेशद्वाराची रचना नागर शैलीची असून त्यावर फुले, पाने कोरलेली आहेत. महाद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवदेवतांच्या मूर्ती कोरणे बाकी आहे. सिंहद्वार हे राममंदिराचे मुख्य द्वार आहे. त्याचबरोबर राममंदिराच्या गर्भगृहात जे दरवाजे बसवले जातील, त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जाणार आहे.
(हेही वाचा – Hot Milk : रात्री गरम दूध पिणं शरीराला उपयुक्त आहे का ? वाचा आहारतज्ज्ञांचे म्हणणे…)
या कामाबाबत मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, ‘रामललांचा अभिषेक दि. १६ ते २४ जानेवारीदरम्यान होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी कारागिरांची संख्या वाढवण्यात आली आहे. जिथे पूर्वी एक हजार कारागीर काम करत होते, तिथे आता तीन हजार कारागीर काम करत आहेत. ‘
Join Our WhatsApp Community