सॅप हाना प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामकाजाला लवकरच सुरुवात

महापालिकेमध्‍ये वापरात असलेली ‘सॅप हाना’ ही ‘सॅप मूलभूत’ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम ९ जुलै २०२१ रोजी रात्री ८ ते २१ जुलै २०२१ रोजी रात्री ८ या कालावधीत करण्यात येणार आहे. या कामकाजामुळे सॅप प्रणालीवर आधारित सेवा या कालावधीत बंद राहणार आहेत. मात्र, सॅप व्यतिरिक्त म्हणजे मालमत्ता कराचा भरणा, जलदेयकांचा भरणा, ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगीच्या अर्जासह २०१६ नंतरचे जन्म-मृत्यू दाखले आदी सेवा उपलब्ध राहणार आहेत.

या सेवा बंद राहणार

संपूर्ण सॅप प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिक व कर्मचारी सॅप प्रणालीवरील कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. जसे की नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, कार्यादेश देणे, अधिदान करणे, २०१६ पूर्वीचे जन्म-मृत्यू दाखले, फिको चलन, अनुज्ञापन(लायसन्स), विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट), बिल्डिंग फॅक्टरी लायसन्स देणे इत्यादी सेवा बंद राहतील.

(हेही वाचाः गोल देऊळ, अलंकार सिनेमा, मुंबई सेंट्रल जवळील तुंबणाऱ्या पाण्यावर सापडला उपाय)

मात्र, महापालिकेच्या सॅप प्रणाली व्यतिरिक्त इतर सेवा या नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. यामध्ये,

मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी- https://ptaxportal.mcgm.gov.in,

जलदेयकांचा भरणा करण्यासाठी- https://aquaptax.mcgm.gov.in,

ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगी अर्जासाठी- https://autodcr.mcgm.gov.in

ही संकेतस्‍थळं सुरू राहणार आहेत. तसेच २०१६ नंतरचे जन्म-मृत्यू दाखले सेवा सुरू राहील.

सहकार्य करण्याचे आवाहन

महापालिकेमार्फत मागवल्या जाणाऱ्या निविदा महाराष्ट्र शासनाच्या इ-टेंडरिंग प्रणालीवर मागवल्या जाणार असल्याने निविदा प्रक्रिया सुरू राहणार आहेत. या अद्ययावतीकरण कालावधीमध्ये कामकाजासाठी नागरिक, कंत्राटदार व कर्मचारी यांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

(हेही वाचाः मुंबईतील चर बुजवण्यासाठी सुमारे ५०० कोटींच्या निविदा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here